सध्या देशात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन्स लॉन्च होत आहेत. अनेक फीचर्स आणि परवडणाऱ्या किंमतीत हे फोन वापरकर्त्यांसाठी लॉन्च होत आहेत. नुकताच Poco कंपनीने आपला Poco X5 Pro लॉन्च केला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे या बजेटमध्ये असलेल्या स्मार्टफोन्समध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. जर का तुम्ही २५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये चांगला स्मार्टफोन शोधत असाल तर आपण आज Poco X5 Pro, Redmi Note 12 Pro आणि Realme 10 Pro Plus जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिस्प्ले (Display)

Realme 10 Pro Plus या स्मार्टफोनमध्ये ६.७० इंचाचा कर्व्ह AMOLED डिस्प्ले येतो. यामध्ये याची मागची बाजू ग्लॉसी प्लॅस्टिक या प्रकारात येते. रिफ्लेक्टिव्ह बॅक काहींना आकर्षक वाटत नसला तरी, फोन खूपच हलका आहे.

Realme 10 Pro Plus प्रमाणे Redmi Note 12 Pro या फोनमध्ये देखील प्लास्टिक बॅक मॅट फिनिश येते. हा फोन दिसायला प्रीमियम आहे. रेडमी कंपनीने आपल्या फोनच्या कॅमेराचे नवीन डिझाईन तयार केले आहे आणि ते फोनच्या उजव्या बाजूला असणार आहे. या फोनचा डिस्प्ले ६.६७ इंचाचा येतो. यामध्ये डॉल्बी व्हिजन सुद्धा कंपनीने दिले आहे.

Poco X5 Pro या स्मार्टफोनची रचना Redmi Note 12 Pro च्या तुलनेत चांगली आहे. पोको कंपनीनेसुद्धा आपला कॅमेराचा बबेट बदलला असून आता तो फोनच्या उजव्या बाजूला असणार आहे. यामध्ये ६.६७ इंचाचा HDR10+ AMOLED डिस्प्ले येतो आणि हा डिस्प्ले गोरिला ग्लास ५ द्वारे संरक्षित करण्यात आला आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: Zoom कंपनी करणार १३०० कर्मचाऱ्यांची कपात; सीईओंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

परफॉर्मन्स

Redmi Note 12 Pro आणि Realme 10 Pro Plus हे दोन्ही स्मार्टफोन MediaTek Dimensity 1080 चिपसेटद्वारे समर्थित आहेत. नुकताच लॉन्च झालेला Poco X5 Pro थोड्याश्या जुन्या म्हणजेच 778G SoC स्नॅपड्रॅगनसह येतो. MediaTek Dimensity 1080 च्या तुलनेत Snapdragon 778G हे थोडे जुने आहे. मात्र गेमिंगसाठी विचार केल्यास Snapdragon 778G हा सर्वोत्तम आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात गेमिंगमध्ये जास्त आवड असल्यास Poco X5 Pro या स्मार्टफोनचा परफॉर्मन्स चांगला आहे.

रेडमी नोट १२ प्रो आणि रिअलमी १० प्रो मध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरकर्त्यांना मिळते. यामध्ये पोको X5 प्रो हा सर्वात महागडा व्हेरिएंट असून यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळते. रिअलमी १० प्रो प्लस या एकमेव स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १३ वापरण्यात आले आहे. रेडमी नोट १२ प्रो आणि पोको एक्स ५ प्रो मध्ये अँड्रॉइड १२ वापरण्यात आले आहे. या सर्व स्मार्टफोन्समध्ये ५,००० mAh क्षमतेची बॅटरी येते.

जाणून घ्या कोणता आहे बेस्ट स्मार्टफोन ?

हे तीनही स्मार्टफोन्स आपल्या वापरकर्त्यांच्या आवडी निवडी पूर्ण करतात की नाही याचे कोणतेही योग्य उत्तर नसले तरी Realme 10 Pro Plus हा स्मार्टफोन इमर्सिव्ह डिस्प्ले आणि चांगला कॅमेरासह परफॉर्मन्समध्ये पहिल्या क्रमांकावर येतो. जर तुम्हाला गेम खेळण्याची आवड असली आणि योग्य बजेटमध्ये चांगली फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधात असाल तर Poco X5 Pro हा फोन खरेदी करू शकता. यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट येते. हा फोन MediaTek Dimensity 1080 पेक्षा जास्त परफॉर्मन्स देतो. Redmi Note 12 Pro हा स्मार्टफोन या दोन्ही फोनच्या मधोमध येतो. यामध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. याचा डिस्प्लेसुद्धा Poco X5 Pro सारखाच येतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poco x5 pro redmi nnote 12 pro realme 10 pro plus smartphones launched with aattractive features tmb 01
First published on: 08-02-2023 at 13:40 IST