Zoom Layoff: सध्या जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कंपन्यांमध्ये कमर्चाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. याचा भारतातील कंपन्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातच आता कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी फर्म असणाऱ्या Zoom कंपनीने सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. झूम कंपनी साधारणपणे आपल्या कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के म्हणजेच सुमारे १,३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सेवांची मागणी कमी झाल्याने ही कपात करण्यात येणार आहे.

१,३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी मंगळवारी कंपनीच्या अधिकृत ब्लॉगद्वारे दिली. याबाबत सर्व अमेरिकी कर्मचाऱ्यांना एक ईमेल येईल आणि अमेरिकेबाहेरील कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार सांगितले जाईल असे यामध्ये प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांचे मेहनती , प्रतिभावान सहकारी असे वर्णन करताना एरिक युआन म्हणाले.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार

हेही वाचा : Tech Layoffs: गुगल, फिलिप्सपाठोपाठ आणखी एका टेक कंपनीचा कामगारांना धक्का, ६६५० जणांची नोकरी जाणार

तसेच सीईओ एरिक युआन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, जे कर्मचारी यामध्ये प्रभावित झालेले आहेत ज्यांना कमवरून काढून टाकण्यात येणार आहे त्यांना पुढील ३० मिनिटांमध्ये तुमच्या झूम व वैयक्तिक अकूटमध्ये एक ईमेल येईल. ज्यामध्ये झूम – व्हाट यू नीड टू नो (Departing Zoom: What You Need to Know) असे लिहिलेले असेल. तर अमेरिकेबाहेरील कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार याबद्दल सूचित केले जाणार आहे.

येत्या आर्थिक वर्षात आपल्या पगारामध्ये ९८ टक्के कपात करणार आहे असे सीईओ एरिक युआन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले. तसेच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की , माझ्या टीममधील सदस्य हे येत्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या पगारामध्ये २० टक्क्यांची कपात करतील आणि बोनस सुद्धा ते घेणार नाहीत.