Realme ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आज भारतात दुपारी Realme 11 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहेत. नवीन स्मार्टफोनला एका लॉन्च इव्हेंटमध्ये रिअलमी बड्स एअर ५ आणि रिअलमी बड्स एअर प्रो ट्रूली वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरफोन्ससोबत लॉन्च करण्यात आले. Realme 11 5G फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 6100+ SoC चा सपोर्ट मिळतो. तसेच याच्या डिस्प्लेला १२० Hz इतका रिफ्रेश रेट मिळतो. व्हॅनिला रिअलमी ११ ५जी मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आपले असून त्यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Realme 11 5G: स्पेसिफिकेशन्स

ड्युअल सिम Realme 11 5G हा फोन अँड्रॉइड १३ आधारित Realme UI 4.0 वर चालतो. त्यात वापरकर्त्यांना ६.७२ इंचाचा फुल एचडी + सॅमसंग AMOLED डिस्प्ले मिळतो. यात फोनमध्ये 6nm मीडियाटेक Dimensity 6100+ SoC हुड अंतर्गत येते. या फोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. हा हँडसेट डायनॅमिक रॅम विस्तार (DRE) फीचरसह येतो जो मोफत स्टोरेज व्हर्च्युअल मेमरी म्हणून वापर करतो. यामधील मेमरी १६ जीबी पर्यंत वाढवता येते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : Airtel चा ‘हा’ रीचार्ज प्लॅन घालतोय धुमाकूळ, ३५ दिवसांची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंग, किंमत फक्त…

Realme 11 5G मध्ये २५६ जीबी पर्यंत स्टोरेज ऑनबोर्ड स्टोरेज पॅक केले आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडीकार्डद्वारे २ टीबीपर्यंत वाढवता येते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम/ड्युअल स्टँडबाय 5G कनेक्टिव्हिटी, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, GPS, A-GPS आणि USB टाइप-सी पोर्ट असे फीचर्स मिळतात. Realme 11 5G मध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच याला ६७W चार्जिंग सपोर्ट मिळतो. फास्ट चार्जिंग टेक्नलॉजीमुळे केवळ १७ मिनिटांमध्ये बॅटरी ० ते ५० टक्के इतकी चार्ज होइल असा दावा करण्यात आला आहे. तसेच यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

किंमत आणि ऑफर्स

Realme 11 5G ची किंमत १८,९९९ रुपये आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेले व्हेरिएंट उपलब्ध आहे. तर ८/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रूपये आहे. हा फोन ग्लोरी गोल्ड आणि ग्लोरी ब्लॅक या रंगात येतो. २९ ऑगस्टपासून याची विक्री सुरू होणार आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच मुख्य रिटेल स्टोअर्सवरून होणार आहे. सुरुवातीची ऑफर म्हणून फ्लिपकार्टवर कंपनी इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. एसबीआय आणि एचडीएफसी खरेदी करणे खरेदी केल्यास १,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realme 11 5g series luanch india sale started 29 august 108 mp camera 5000 mah battery check details tmb 01