Reliance Jio देतेय दररोज ३ GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल ऑफर, १ वर्षासाठी Hotstar पाहा मोफत

आज आम्ही तुम्हाला Jio च्या ६०१ रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल सर्व काही सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये ९० GB पेक्षा जास्त डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात.

Reliance-Jio-3
(फाइल फोटो)

जर तुम्ही अशा मोबाईल युजर्सपैकी असाल ज्यांचा दररोज इंटरनेट डेटा वापरण्यात जातो. अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओचे अनेक प्रीपेड प्लॅन आहेत. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओकडे असे एकूण ४ प्रीपेड प्लॅन आहेत ज्यात दररोज ३ जीबी डेटा उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला Jio च्या ६०१ रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल सर्व काही सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये ९० GB पेक्षा जास्त डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात.

रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या ६०१ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. विशेष बाब म्हणजे दररोज उपलब्ध असलेल्या ३ जीबी डेटाशिवाय कंपनी ग्राहकांना ६ जीबी अतिरिक्त डेटा देखील देते. म्हणजेच, या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण ९० + ६ GB हाय-स्पीड डेटाचा लाभ घेऊ शकता. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, स्पीड ६४ Kbps पर्यंत घसरतो.

जिओच्या या स्वस्त प्रीपेड प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. म्हणजेच ग्राहक कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता अनलिमिटेड STD, लोकल आणि रोमिंग कॉल करू शकता. कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस ऑफर करते.

आणखी वाचा : Flipkart Big Bachat Dhamaal Sale: विवो, सॅमसंग, पोको आणि मोटोरोला फोनवर बंपर सूट, हजारोंची बचत

याशिवाय रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये ओटीटी सबस्क्रिप्शनही मोफत मिळते. डिस्ने + हॉटस्टार सदस्यत्व रिचार्ज पॅकमध्ये उपलब्ध आहे. जिओच्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. या प्लॅनमध्ये कंपनी १ वर्षासाठी Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन देते. याशिवाय, कंपनीकडे असे आणखी तीन प्रीपेड प्लॅन आहेत जे दररोज ३ जीबी डेटा देतात. यामध्ये ४१९९ रुपये १, १९९ आणि ४१९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या सर्व प्लॅनमध्ये दररोज ३ GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० SMS दररोज उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliance jio 601 rs best prepaid plan 3gb daily data unlimited call free disney plus hotstar subscription prp

Next Story
DigiLocker WhatsApp Services : आता व्हॉट्सअ‍ॅपवरून डाउनलोड करता येणार पॅन आणि आधारकार्ड; जाणून घ्या तपशील
फोटो गॅलरी