काल Samsung चा Unpacked 2023 इव्हेंट पार पडला. यामध्ये सॅमसंगने S23 या सिरीजमधील स्मार्टफोन्स आणि Galaxy Book 3 ही लॅपटॉपची सिरीज लाँच केली आहे. Galaxy Book 3 मध्ये एकूण ३ लॅपटॉपचा समावेश आहे. Galaxy Book 3 Pro, Galaxy Book 3 Pro 360 आणि Galaxy Book 3 Ultra असे हे तीन लॅपटॉप आहेत.
Galaxy Book3 Ultra चे फीचर्स
या सर्वात शक्तिशाली अशा लॅपटॉपमध्ये वापरकर्त्यांना १३व्य जनरेशनचा इंटेल कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच vidia GeForece RTX 4050/4070 हे ग्राफिक्स कार्ड त्यात देण्यात आले आहे. तसेच यात १६ ते ३२ जीबी इतकी LPDDR5 रॅम देण्यात आलेली आहे.या Ultra मॉडेलला १०० वॅटचा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Galaxy Book3 Pro चे फीचर्स
काल झालेल्या इव्हेंटमध्ये सॅमसंगने Galaxy Book3 Pro सिरीज लाँच केली . यामध्ये १४ इंचाचा Galaxy Book3 Pro 360 आणि १६ इंचाचा Galaxy Book3 Pro या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. या लॅपटॉप्सना 13th Gen Intel Core प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच Intel Iris Xe हे ग्राफिक्स कार्ड देण्यात आले आहे. या लॅपटॉपमध्ये ८जीबी ते ३२ जीबी इतकी LPDDR5 रॅम आहे. तसेच याला ६५ वॅटचा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
नवीन लॅपटॉप्समध्ये Windows 11 होम ऑपरेटिंग सिस्टीममध्ये AMOLED 2X डिस्प्ले, एक HDMI, दोन थंडरबोल्ट ४, एक मायक्रोएसडी स्लॉट, USB ३.२ टाइप-ए पोर्ट आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक मिळते. तसेच ७६ वॅटचा चार्जिंग सपोर्ट आणि बॅटरीची क्षमता ही ४९०० mAh इतकी आहे.
काय आहे Galaxy Book 3 लॅपटॉपच्या किंमती ?
Galaxy Book3 Ultra लॅपटॉपची जागतिक बाजारात $२,१९९ (सुमारे १८,०२,२०० रुपये ) पासून सुरु होते. याचे प्री बुकिंग १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे तर , २२ फेब्रुवारीपासून ते विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. Galaxy Book3 Pro ची किंमत $ १,२४९ (सुमारे १,०२,४०० रुपये) आहे. Galaxy Book3 Pro ची सुरुवातीची किंमत $१,३९९ (सुमारे १,१४,७०० रुपये )असणार आहे. यासाठी प्री-बुकिंग सुरु असून १७ फेब्रुवारीपासून ते उपलब्ध होणार आहेत.