Samsung Galaxy M04 launched : सॅमसंगच्या गॅलक्सी या लोकप्रिय सिरीजमध्ये आणखी एका सदस्याचा समावेश झाला आहे. कंपनीने Samsung Galaxy M04 हा स्मर्टफोन लाँच केला आहे. बजेट फोन हवा असणाऱ्यांसाठी हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनची किंमत काय आणि त्यामध्ये कोणते फीचर्स मिळत आहेत? याबाबत जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोनमध्ये काय आहे नवीन?

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच ७२० पिक्सेल डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा सेटअप ज्यामध्ये १३ एमपी मुख्य कॅमेरा आणि २ एमपी सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये ५ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे.

(भारतात लाँच झाला जगातील सर्वात हलका लॅपटॉप, ’12 GB Ram’सह मिळतंय बरंच काही, जाणून घ्या किंमत)

फोनमध्ये ४जी मीडियाटेक हेलिओ पी३५ चीप मिळते आणि ४ जीबी पर्यंत रॅम मिळते. तुम्ही ६४ जीबी किंवा १२८ जीबी स्टोअरेज व्हेरिएंट घेऊ शकता. दोन्ही व्हेरिएंटमध्ये स्टोअरेज १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर नाही, परंतु फेस अनलॉक फीचर मिळते.

किंमत

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज व्हेरिएंट ९ हजार ४९९ रुपये, तर ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंट १० हजार ४९९ रुपयांमध्ये मिळत आहे. एसबीआय क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शनद्वारे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १००० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

सॅमसंग गॅलक्सी एम०४ हा स्मार्टफोन लाइट ग्रीन आणि डार्क ब्ल्यू या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन सॅमसंग.कॉम, अमेझॉन इंडिया आणि निवडक रेटिले आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy m04 launched at rupees 9499 check features ssb