scorecardresearch

भारतात लाँच झाला जगातील सर्वात हलका लॅपटॉप, ’12 GB Ram’सह मिळतंय बरंच काही, जाणून घ्या किंमत

Acer Swift Edge laptop : लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर एसरने चांगला पर्याय उपलब्ध केला आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी Acer Swift Edge laptop लाँच केला आहे.

Acer Swift Edge
(pic credit – acer.com)

Acer Swift Edge laptop launched in India : लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर एसरने चांगला पर्याय उपलब्ध केला आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी Acer Swift Edge laptop लाँच केला आहे. लॅपटॉप उत्पादन केंद्रित ग्राहकांसाठी डिझाईन करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हा जगातील सर्वात हलका लॅपटॉप म्हणून ओळखल्या जातो. या लॅपटॉपची किंमत काय? आणि त्यामध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत? याबाबत जाणून घेऊया.

फीचर

Acer Swift Edge laptop मध्ये (३८४०x२४०० पिक्सेल) १६ इंच ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ४ के रेझॉल्युशन देतो. लॅपटॉपमध्ये एमएमडी रायझेन ७ ६८०० यू ऑक्टाकोअर प्रोसेसर, १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोअरेज देण्यात आली आहे. किबोर्ड आकाराने मोठे आहे, मात्र त्यात नम पॅड देण्यात आलेले नाही. परंतु, बायोमेट्रिक सुरक्षेसाठी त्यामध्ये फिंगरप्रिंट रिडर देण्यात आले आहे.

(लाँच झाला बजेट फ्रेंडली Nokia C31, ५०५० एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅमसह मिळतात ‘ही’ फीचर्स)

लॅपटॉपमधील फूल एचडी वेबकॅममध्ये ६० एफपीएस व्हिडिओ रेकॉर्डिंगची क्षमत आहे, असे एसरचे म्हणणे आहे. व्हिडिओ कॉल्सदरम्यान स्पष्ट आवाज मिळण्यासाठी लॅपटॉप टेम्पोरल नॉइस रिडक्शनला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये दोन यूएसबी सी टाइप पोर्ट, यूएसबी ३.२ जेन १ पोर्ट आणि एचडीएमआय पोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये वायफाय ६ई वायरलेस कनेक्टिव्हिटी मिळते. लॅपटॉपमध्ये ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०२१’सह विंडोज ११ होमचा समावेश आहे.

लॅपटॉपचे वजन १.१७ किलोग्राम आहे. त्याची बॉडी बनवण्यासाठी अलॉयचा वापर करण्यात आला आहे. जे नियमित अ‍ॅल्युमिनियमपेक्षा मजबूत आणि २० टक्के हलके आहे.

(Whatsapp call : व्हॉट्सअ‍ॅपवर Call Recording करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स)

किंमत

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, Acer Swift Edge लॅपटॉप १ लाख २४ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये एसर इंडिया ई स्टोअर आणि अमेझॉनवर उपलब्ध होईल. लॅपटॉप ऑलिव्हिन ब्लॅक रंगामध्ये मिळेल. त्याच्यासह ६५ वॉट पीडी चार्जर आणि टाइप सी पावर कॉर्ड मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 19:06 IST