Tecno आपला नवीन स्मार्टफोन Tecno Camon 19 Pro Mondrian Edition भारतात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या टेक्नो फोनमध्ये कॅमन 19 प्रो प्रमाणेच फीचर्स आणि डिझाईन असेल. पण मॉन्ड्रियन एडिशन स्मार्टफोनमध्ये कंपनीने पॉलीक्रोमॅटिक फोटोआयसोमर टेक्नॉलॉजी दिली आहे, ज्यात सूर्यप्रकाशामध्ये फोनचा रंग बदलतो. विवो गेल्या काही महिन्यांपासून आपल्या स्मार्टफोनमध्ये ही टेक्नॉलॉजी देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Tecno ने अद्याप लॉंचची तारीख उघड केलेली नाही. परंतु नवीन Tecno Camon 19 Pro Mondrian Edition या महिन्यात लॉंच होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.

Tecno Camon 19 Pro Mondrian Edition ला मूळ Tecno Camon 19 Pro प्रमाणेच फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. Tecno Camon 19 Pro गेल्या महिन्यातच देशात लॉंच करण्यात आला होता. कंपनीने यूट्यूब व्हिडीओ जारी करून आगामी स्मार्टफोनच्या डिझाईनचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : 5G Network Rollout: कोणता 5G फोन खरेदी करणं ठरेल फायदेशीर? हे टॉप-६ पर्याय पाहा

Tecno Camon 19 Pro Mondrian Edition मध्ये मागील पॅनलवर अनेक आयताकृती ब्लॉक्स आहेत. फोनचा मागील पॅनेल पांढरा राहतो. परंतु सूर्यप्रकाश पडताच मागील पॅनेलचा रंग बदलतो. पण Vivo V25 Pro च्या विपरीत Camon 19 Pro Mondrian Edition सूर्यप्रकाश असताना अनेक रंग दाखवतो. फोनची एकूणच डिझाईन बरीच प्रीमियम आहे आणि छान दिसते.

Tecno Camon 19 Pro Mondrian Edition Specifications
Tecno Camon 19 Pro Mondrian Edition मध्ये FullHD+ रिझोल्यूशनसह ६.८ इंचाची IPS LCD स्क्रीन असेल अशी अपेक्षा आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz असेल. हँडसेटमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर, ८ GB रॅम आणि २५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळेल.

आणखी वाचा : सप्टेंबर महिन्यात लॉंच होणार आहेत हे स्मार्टफोन्स, नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी ही यादी जरूर पाहा

फोटोग्राफीसाठी, Tecno Camon 19 Pro मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. हँडसेटमध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर असण्याची अपेक्षा आहे. ज्याला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), ५० मेगापिक्सेल पोर्ट्रेट आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर मिळेल. फ्रंट पॅनलबद्दल बोलायचे झाले तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Camon 19 Pro Mondrian एडिशनला चार्ज करण्यासाठी ३३ W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते. हँडसेट Android 12 आधारित HiOS ८.६ सह येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tecno camon 19 pro mondrian edition launch in india in september color changing back pannel know all about this prp
First published on: 02-09-2022 at 19:46 IST