सध्या भारतात अनेक कंपन्या आहे जसे की रिलायन्स जिओ , एअरटेल , वोडाफोन आयडिया आणि अन्य टेलिकॉम कंपन्या ज्या आपल्या वापरकर्त्यांसाठी खास नवनवीन प्लॅन्स आणत असतात. तसेच आता भारतात नवीन तंत्रज्ञान येत आहेत. ५जी सेवा भारतात देखील सुरु झाली आहे. भारताच्या अनेक शहरांमध्ये ५जी सेवा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

5G सर्व्हिसमध्ये सध्या रिलायन्स जिओ हे आघाडीवर आहे. देशातील १८४ शहरांमध्ये जिओ आघाडीवर आहे. सध्या जिओने ९४.६ टक्के लोकसंख्येला ५जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. रिसर्च फर्म Techhark च्या अहवालानुसार २५ जनवरी २०२३ भारतातील २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ५जी सेवेचा वापर करत आहे. या अहवालांनुसार देशातील १८९ शहरांमध्ये ही २५ .२ टक्के लोकसंख्या विखुरलेली आहे.

हेही वाचा : Dangerous Apps: तुमच्या स्मार्टफोनमधून ‘हे’ २०३ अ‍ॅप्स डिलीट करा, नाहीतर…

रिसर्च फर्म Techhark ही ५जी च्या कव्हरेजच्या डेव्हलपमेंटवर लक्ष ठेवण्यासाठी ‘इंडिया 5G डॅशबोर्ड’ तयार केला आहे. हा ५जी डॅशबोर्ड हा आठवड्याच्या माहितीवरून अपडेट करण्यात येणार आहे असे Techharc ने सांगितले .

२५ जानेवारीपर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार जिओ ने १८४ शहरांमध्ये ५जी सेवा उपलब्ध करून आघाडी मिळवली आहे. जे भरतील ९४.६ टक्के लोकसंख्येला उपलब्ध करून देण्यात आले आहे . एअरटेल ५जी ५२ शहरांमध्ये उपब्ध आहे. एअरटेल ४४.८ टाके लोकसंख्येमध्ये ५जी सेवा पुरवत आहे.डॅशबोर्ड डेटाच्या आधारे भारतातील २५.२ टक्के लोकसंख्येला ५जी नेटवर्कने कव्हर केले आहे. देशामधील ४१ टक्के स्मार्टफोन वापरणारे असे आहे की ज्यांनी नेटवर्क अपग्रेड केले की, ते ५जी चे वापरकर्ते होऊ शकतात.

हेही वाचा : नाव मोठं, लक्षण खोटं: ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये टॉयलेटला जायचीही चोरी, कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा

५जी नेटवर्कमध्ये २४ शहरांसह गुजरात राज्य आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकमधील १९ शहरे आणि आंध्र प्रदेशमधील १६ शहरे आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत ५जी सेवेत दिल्ली आणि चंदीगड आघाडीवर आहेत. मेघालय राज्यात फक्त ५ टक्के लोकसंख्या ५जी सेवेचा वापर करते आहे असे अहवालात म्हटले आहे.

Techharc 5G डॅशबोर्ड नुसार जीओ २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. एरटेलचे ५जी नेटवर्क २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत की तिथे जिओ आणि एअरटेल हे दोन्ही ऑपरेटर ५जी सेवा देत आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There 5g networks in 184 countries india jio and airtel companies are providing services tmb 01
First published on: 28-01-2023 at 11:25 IST