Smartphone Tips : तुम्हीही ‘या’ पद्धतीने स्वच्छ करता आपला स्मार्टफोन? होऊ शकते स्क्रीनचे नुकसान

आपला फोन वाईट दिसू लागल्यास आपल्याला इतरांसमोर फोन वापरण्यासही लाज वाटू शकते.

Smartphone Tips : तुम्हीही ‘या’ पद्धतीने स्वच्छ करता आपला स्मार्टफोन? होऊ शकते स्क्रीनचे नुकसान
आपला स्मार्टफोन वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Pixabay)

आज क्वचितच असा कोणी असेल जो स्मार्टफोन वापरत नसेल. काम असो किंवा करमणूक, आता आपण आपल्या बहुतेक कामांसाठी आपल्या मोबाईल फोनवर अवलंबून असतो आणि या कारणामुळेच आपण फोनशिवाय एक मिनिटही लांब राहू शकत नाही. अशावेळी आपला स्मार्टफोन वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बऱ्याचवेळा लोक निष्काळजीपणे आपला फोने स्वच्छ करतात. अनेकजण गडबडीत पाण्याने फोन स्वच्छ करतात. तुम्हीही असे करता का? तर वेळीच सावध व्हा. असे केल्याने आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन खराब होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. स्मार्टफोनची स्क्रीन खराब झाल्यावर आपला फोन जुना दिसू लागतो किंवा फोनच्या आतील नाजूक भागांना पोहचू शकते. आपला फोन वाईट दिसू लागल्यास आपल्याला इतरांसमोर फोन वापरण्यासही लाज वाटू शकते.

अशा प्रसंगांना सामोरे जावे लागू नये यासाठी तुम्ही विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा फोन तर सुरक्षित राहीलच पण स्मार्टफोन स्मार्टही दिसेल. आपला फोन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वप्रथम त्यावर स्क्रीनगार्ड बसवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्क्रीन गार्ड फोनच्या स्क्रीनला धूळ, घाण आणि ओरखडे यापासून संरक्षण देतो. एवढेच नाही तर फोन हातातून पडला तरी स्क्रीनचे नुकसान होत नाही. आता आपण, कोणत्या पद्धतीने आपला स्मार्टफोन स्वच्छ करू नये, हे जाणून घेऊया.

Photos : WhatsApp वर चॅट करणे होणार आणखीनच सुरक्षित; नव्या फीचरमुळे युजर्स खुश

  • पेपरने स्क्रीन कधीही साफ करू नका

मोबाईल कधीही पेपर टॉवेलने, फेशियल टिश्यूने किंवा कागदापासून बनवलेल्या वाइप्सने स्वच्छ करू नये. यामुळे स्क्रीनवर ओरखडे पडतात आणि फोनची स्क्रीन वाईट दिसू शकते.

  • कोणत्याही लिक्विडने किंवा पाण्याने स्क्रीन स्वच्छ करू नका

फोन पाण्याने किंवा कोणत्याही सामान्य लिक्विडने स्वच्छ करणे टाळा. आवश्यक असल्यास, एका लहान स्प्रे बाटलीमध्ये डिस्टिल्ड पाणी घ्या आणि त्यात ७०% आयसोप्रोपाइल अल्कोहोल भरा. मायक्रोफायबर कापडावर हे लिक्विड स्प्रे करा आणि नंतर त्याच्या मदतीने फोनची स्क्रीन स्वच्छ करा. अल्कोहोल सौम्य असते आणि ते स्क्रीनवरून त्वरीत सुकते. परंतु जर तुम्ही फोन स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरत असाल तर ते फोनमध्ये देखील शिरू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Location Tracking : मोबाईलमधून ‘या’ पद्धतीने तुम्ही करू शकता कोणाचेही लोकेशन ट्रॅक
फोटो गॅलरी