एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून ट्विटरमध्ये सातत्याने काही बदल करण्यात येत आहेत. बदल करून त्याचा काय परिणाम होतो ते पहिले जात आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची कपात असो, ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा असो असे अनेक बदल आतापर्यंत ट्विटरमध्ये केले गेले आहेत. त्यातच आता एलॉन मस्क यांनी Chatgpt ला पर्याय विकसित करण्यासाठी नवीन संशोधन प्रयोगशाळा तयार करण्याबाबत मागच्या आठवड्यात AI संशोधकांशी संपर्क साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख मस्क यांनी अलीकडेच अल्फाबेटचे डीपमाइंड एआय युनिट सोडलेल्या संशोधक इगोर बाबुस्किनची नियुक्ती केली होती असे अहवालात म्हणण्यात आले आहे. ChatGPT हा OpenAI द्वारे विकसित केलेला चॅटबॉट आहे जो धडे , कविता किंवा सूचनेनुसार संगणक कोड देखील तयार करू शकतो.

हेही वाचा : MWC 2023: Honor कंपनीने लॉन्च केला आपला ‘हा’ जबरदस्त फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत…

मस्क यांनी २०१५ मध्ये सिलिकॉन व्हॅलीचे गुंतवणूकदार सॅम ऑल्टमनसह ना नफा स्टार्टअपच्या रूपात OpenAI ची सह-संस्थापना केली होती. २०१८ मध्ये त्यांनी chatbot ला भयानक म्हटले होते. एलॉन मस्क आणि बाबुस्किन यांनी AI संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी एक टीम सोबत ठेवण्याच्या दृष्टीने चर्चा केली. मात्र प्रोजेक्ट अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अहवालात नंतरच्या मुलाखतीचा संदर्भ देत सांगण्यात आले की विशिष्ट उत्पादने विकसित करण्यासाठी कोणतीही ठोस योजना तयार झाली नाही. बाबुस्किन यानी मस्क यांच्या प्रोजेक्टवर अधिकृतपणे स्वाक्षरी केली नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter ceo elon musk develop to team for rival openai chatgpt tmb 01