ChatGpt च्या मदतीने डॉक्टरांनी वाचवला आजारी कुत्र्याचा जीव, कसे ते जाणून घ्या

सॅसी नावाच्या कुत्र्याला टिक-बोर्न विषाणूचा संसर्ग झाला होता.

chatgpt -4 saves dog life
chatgpt save dog life (Image Credit-Cooper/twitter)

AI ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च झाल्यापासून जगभरामध्ये त्याबद्दल अनेक तर्क बांधले जात आहेत. AI ChatGpt चॅटबॉट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देते. यादरम्यान chatgpt ने सोडवलेल्या किंवा तो अभ्यास करत असलेल्या अनेक केस स्टडीजही समोर येत आहेत. एका व्यक्तीने दावा केला आहे की, चॅट जीपीटीमुळे त्याच्या आजारी कुत्र्याचा जीव वाचला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.

एका व्यक्तीने दावा केला आहे की, चॅट जीपीटीमुळे त्याच्या आजारी कुत्र्याचा जीव वाचला आहे. यावर डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीने चॅटजीपीटीची मदत घेतली आणि त्याने दिलेल्या सूचनांनुसार उपचार केले असता त्या व्यक्तीचा कुत्रा बरा झाला. या व्यक्तीने चॅटजीपीटीचे उत्तरही सोशल मीडियावर शेअर केले आहे.

हेही वाचा : Jio Fiber Backup Plan: जिओ युजर्ससाठी आनंदाची बातमी, IPL २०२३ आधी लॉन्च झाला ‘हा’ सर्वात स्वस्त प्लॅन, जाणून घ्या

नक्की काय आहे प्रकरण ?

दरम्यान , @peakcooper एका ट्विटर वापरकर्त्याने एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी या प्रकाराबद्दलचे वर्णन लिहिले आहे. यासह त्यांनी त्यांच्या कुत्र्याचे फोटो आणि कुत्र्याच्या आजारावर चॅटजीपीटीने दिलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले आहेत. त्या व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांच्या सॅसी नावाच्या कुत्र्याला टिक-बोर्न विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यावर पशु वैद्यकाने उपचार सुरु केले. कुत्र्याला मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आला होता मात्र उपचार सुरु झाल्यामुळे त्याची प्रकृती काही प्रमाणात सुधारत होती. मात्र पुन्हा काही दिवसांनी त्याची तब्येत बिघडली.

वापरकर्त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या कुत्र्याच्या हिरड्या खूप पिवळ्या आल्या होत्या. त्यामुळे तो पुन्हा आपल्या कुत्र्याला पशुवैद्याकडे घेऊन गेला. त्यानंतर त्याची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच त्यासोबत अनेक चाचण्या करण्यात आल्या पण काही ठोस निदान मिळाले नाही. कुत्र्याची प्रकृती बिघडत चालली होती. मात्र त्यामागचे कारण सापडत नव्हते. आम्ही कुत्र्याला दुसऱ्या दवाखान्यात नेले. तसेच आम्ही ChatGPT -४ वर कुत्र्याच्या आजाराबद्दल लिहिले आणि त्यावर काय उपचार करावेत असा प्रश्न विचारला.

चॅटजीपीटीने दिलेल्या उत्तरामध्ये लिहिले की , मी काही पशुवैद्यक तर नाही आहे पण काही गोष्टी मी सांगू शकतो. यानंतर जे काही झाले तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. चॅटजीपीटीने सुचवले अ‍ॅनीमियामुळे कुत्र्याला अनेक रोग एकाच वेळी झाले आहेत. यावर काय करू शकतो असे जीपीटीला विचारले असता त्याने भली मोठी यादी दिली आणि उपायांबद्दल सांगितले. ChatGPT ने यासाठी काही उपचार सुचवले ज्यात अल्ट्रासाऊंडचा समावेश होता.

हेही वाचा : ChatGPT ने भारतविषयी सांगितल्या ‘या’ १० गोष्टी; ज्या तुम्हालाही माहिती नसतील, जाणून घ्या

यानंतर त्या व्यक्तीने सर्व गोष्टींचे प्रिंटआऊट घेतले आणि डॉटरांकडे जाऊन हे उपाय करणे शक्य आहे का असे विचारले. डॉक्टरांनी मान्य केले की हे संभाव्य निदान असू शकते. त्यांनी त्यावर काम सुरु केले. अनेक चाचण्या केल्यावर अनेक आजारांचे निदान झाले. याचा अर्थ GPT4 बरोबर होता. नंतर डॉक्टरांनी त्याच पद्धतीने उपचार सुरु केले व कुत्र्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 12:54 IST
Next Story
AI च्या मदतीने ११ वर्षांच्या भारतीय मुलीने तयार केले Eye disease detection app; नेटिझन्स म्हणाले…
Exit mobile version