बँकेच्या कामासाठी, शाळेच्या कामांसाठी किंवा इतर काही कामांसाठी ओळखपत्र म्हणून आधार मागितले जाते. आधार हे माहिती देते. मात्र आधार नंबरचा कुणी गैरवापर करू शकते अशी भिती सध्या लोकांच्या मनात आहे. तसेच आधार कार्ड पॅनशी जोडण्यात आला आहे आणि हे दोन्ही बँकेशी जोडण्यात आल्याने फसवणूक करणारे आधार नंबरद्वारे नुकसान करू शकतात, असा समाज देखील लोकांमध्य आहे. मात्र यूआयडीएआयने या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक दिलासादायक बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधारकार्डच्या सुरक्षेबाबत लोकांना असलेली चिंता यूआयडीएआयने खोडून काढली आहे. केवळ आधार नंबरमुळे बँक अकाउंट हॅक होत नाही असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे. तसेच, आधार कार्डचा नंबर सार्वजिनक होईल असे वाटत असेल तर यूआयडीएआयने त्यावर उपाय देखील सूचवले आहे.

(स्मार्टफोन वापरकर्त्यांपेक्षा लॅपटॉप युजर्स खोटं बोलण्यात अधिक पटाईत? जाणून घ्या रिसर्च काय म्हणते)

आधार नंबरचा खुलासा करायचा नसल्यास तुम्ही व्हीआयडी किंवा मास्कड आधारचा वापर करू शकता, असे सूचवण्यात आले आहे.
व्हीआयडी किंवा मास्कड आधारचा उपयोग मान्य असून ते व्यापकरित्या स्विकार केला जात असल्याचे देखील यूआयडीएआयने आपल्या ट्विटर हँडलवर सांगितले.

यूआयडीएआयने इतके आधारकार्ड केले रद्द

बनावट आधारकार्डवर सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. अहवालानुसार, आधार बनवणाऱ्या यूआयडीएआयने आतापर्यंत ६ लाखांपेक्षा अधिक बनावट कार्ड रद्द केले आहेत. बनावट आधार कार्ड रद्द झाल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभा अधिवेशनात दिली होती. ते म्हणाले की यूआयडीएआयकडून डुप्लिकेट आधारावर मोठी कारवाई केली जात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uidai on bank account hack by aadhaar number ssb