Redmi K50i 5G: Xiaomi च्या वतीने मजबूत फीचर्स असलेला Redmi K50i 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. आता हाच भन्नाट फोन सवलतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे आहे. शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon या फोनवर सुमारे भरघोश सूट देत आहे आणि अनेक बँक ऑफर्सचा फायदाही ग्राहकांना दिला जात आहे. जाणून घ्या किती मिळेल तुम्हाला सवलत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किती मिळेल सूट?
Amazon सेलमध्ये Redmi K50i 5G स्मार्टफोनवर २२ टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर या फोनची किंमत फक्त २४,९९९ रुपये आहे. या फोनवर १७,५५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे, त्यानंतर या फोनची किंमत ७,४४९ रुपये होईल. तथापि, जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असेल तरच तुम्हाला इतकी सूट मिळेल. तसेच या स्मार्टफोन फोनवर HSBC बँक क्रेडिट कार्ड आणि Amazon Pay लेटरसह मोठी सूट आणि कॅशबॅक देखील मिळत आहे.

आणखी वाचा : OnePlus भारतात लाँच करणार आणखी एक धमाकेदार स्मार्टफोन; स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या फीचर्स

Redmi K50i 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
Redmi K50i ६.६-इंचाच्या IPS LCD डिस्प्लेसह देण्यात आला आहे. जो फुल HD+ रिझोल्यूशन आणि १४४Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हे MediaTek Dimensity ८१०० chipset द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. स्टोरेजच्या बाबतीत, स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे. पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP53 रेटिंगसह यात 3.5 मिमी हे देण्यात आला आहे

Redmi K50i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ६४ एमपी प्राथमिक सेन्सर, ८ एमपी वाइड-एंगल लेन्स आणि २ एमपी मॅक्रो सेन्सर आहे. Redmi K50i मध्ये ५,०८०mAh ची बॅटरी ६७W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up to rs 20000 discount on redmi k50i 5g smartphone pdb