भारत देशामध्ये अनेक कंपन्या गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. Apple ने देखील आपले रिटेल स्टोअर्स भारतात सुरू केले आहेत. फॉक्सकॉन कंपनीने देखील देशामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अमेरिकेतील एक सेमीकंडक्टर कंपनी ‘Microchip टेक्नॉलॉजी’ कंपनीने मायक्रोन, अप्लाइड मटेरियल्स आणि लॅम रिसर्च यांच्यापाठोपाठ भारतातील आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी ३०० मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या योजनेची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील आपले अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने हैद्राबादमध्ये वन गोल्डन माईल ऑफिस टॉवर येथे आपले नवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) सेंटर सुरू केले आहे. १,६८,००० चौरस फुटाच्या या सेटरमध्ये १ हजार कर्मचारी काम करणार आहेत. यामध्ये बंगळुरू आणि चेन्नई येथील R&D सेंटर आणि हैदराबाद, पुणे आणि नवी दिल्ली येथील विक्री कार्यालयांचा समावेश आहे.

हेही वाचा : VIDEO: Twitter ने लॉन्च केले युट्युब आणि व्हॉट्सअ‍ॅपसारखे ‘हे’ भन्नाट फिचर, व्हिडीओचा घेता येणार आनंद

या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे मायक्रोचिपच्या बंगळुरू आणि चेन्नई येथील इंजिनीरिंग प्रयोगशाळांच्या संख्येमध्ये वाढ होईलच शिवाय हैदराबादच्या नवीन रिसर्च आणि डिव्हल्पमेंट सेंटरला देखील चालना मिळेल. कंपनीच्या निवेदनानुसार भारतातील ग्राहकांच्या तांत्रिक आणि व्यावसायिक समर्थनाच्या गरजा पूर्ण करण्यावर कंपनी भर देत आहे. याबाबतचे वृत्त livemint ने दिले आहे.

तसेच मायक्रोचिप कंपनी म्हणाली, या योजनांमुळे महत्वाच्या नियुक्त्यांना चालना मिळेल. याशिवाय कंपनीचा मानस हा तांत्रिक संघटन, शैक्षणिक संस्था आणि कार्यक्रमांना समर्थन आणि प्रादेशिक गरज पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रमांची एक सिरीज सुरू करण्याचा आहे.

मायक्रोचिप कंपनीचे भारतात अंदाजे २,५०० कर्मचारी आहेत. जे सेमीकंडक्क्टर डिझाईन आणि डेव्हलपमेंट, विक्री आणि सपोर्ट IT संबंधित पायाभूत सुविधा इंजिनिअरिंग ऑपरेशन्समध्ये काम करतात. जे औद्योगिक, ऑटोमोटिव्ह, डेटा सेंटर, एरोस्पेस, संरक्षण, दळणवळण आणि क्षेत्रामध्ये ग्राहकांना सपोर्ट देतात.

हेही वाचा : Twitter ला टक्कर देण्यासाठी Meta आणणार ‘हे’ नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, या आठवड्यातच लॉन्च होण्याची शक्यता

मायक्रोचिप कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ गणेश मूर्ती म्हणाल ,”मायक्रोचिप भारतात आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी एक महत्वपूर्ण रणनीती आखात आहे. ज्याच्या जबरदस्त डेव्हलपमेंटने आमच्या क्षेत्रातील व्यवसाय आणि तांत्रिक स्त्रोतांपैकी एक प्रमुख स्त्रोत म्हणून प्रस्थापित झाले आहे.” इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशन आणि काउंटरपॉईंट रिसर्चने अलीकडेच एक रिपोर्ट सादर केला. त्यात असे म्हटले आहे की भारतातील सेमीकंडक्क्टरची बाजारपेठ २०२६ पर्यंत ६४ बिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जे २०१९ मधील २२.७ अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास तिप्पट आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usa based microchip semiconductor company invest 300 million open r and d center in hyderabad tmb 01