scorecardresearch

पुणे न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Who gives blood samples Police are investigating
पुणे : रक्ताचे नमुने देणारा कोण? पोलिसांकडून तपास सुरू

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले.

Five fake Bangladeshis arrested in Bhosri Fake Aadhaar Card and passport confiscated
भोसरीत बनावट पाच बांगलादेशी अटकेत; बनावट आधार कार्ड, पारपत्र जप्त

बनावट कागदपत्रांसह बेकायदा राहणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना दहशत विरोधी पथकाने भोसरीतील शांतीनगर येथून अटक केली.

series of misadventures in Sassoon hospital Department of Medical Education not taking any action
गैरकारभारांमुळे ‘सर्वोपचार’ रुग्णालयच ‘गंभीर आजारी’! ससूनमध्ये गैरप्रकारांची मालिका; वैद्यकीय शिक्षण विभाग बघ्याच्या भूमिकेत

रक्ततपासणी अहवाल बदलण्यापासून अमली पदार्थांच्या सूत्रधाराला मदत करण्यापर्यंतच्या गैरप्रकारांत चक्क डॉक्टरांचाच सहभाग असल्याचे आरोप होत असल्याने ‘ससून’ची प्रतिमा खालावली आहे.

Controversial career of Dr. Ajay Tavare in Sassoon Hospital
ससूनमधील डॉ. अजय तावरेंची वादग्रस्त कारकिर्द; मूत्रपिंड रॅकेटपासून आमदाराच्या शिफारसपत्रापर्यंत…

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना…

There was no technical failure in Porsche in pune accident case Preliminary report of RTO
‘पोर्श’मध्ये तांत्रिक बिघाड नव्हता! आरटीओचा प्राथमिक अहवाल; कंपनीच्या तंत्रज्ञांकडूनही मोटारीची तपासणी

कल्याणीनगर अपघातातील पोर्श मोटारीमध्ये अपघात घडला त्यावेळी कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, असा प्राथमिक निष्कर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) काढला आहे.

Heavy rainfall from June in state above average rainfall forecast from June to September in the state
राज्यात जूनपासून कोसळधारा, जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, नियोजित वेळेत केरळमध्ये दाखल होईल. जून महिन्यापासूनच महाराष्ट्रासह मध्य भारतात दमदार सरी कोसळण्याचा अंदाज…

Jitendra Awhad ajit pawar pune accident
पुण्यातील अपघात प्रकरणावरून आव्हाडांची अजित पवारांवर टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीचं कार्यालय खरेदीसाठी…”

ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफांशी संबंध असून मुश्रीफांनीच त्यांना पाठिशी घातल्याचा…

Permission to arrest Vishal Aggarwal in the case of threatening a motorist
Pune Accident Case : मोटारचालकाला धमकी प्रकरणात विशाल अगरवालला अटक करण्यास परवानगी

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाबरोबर मोटारीत असलेल्या चालकाला धमकाविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाला याला अटक…

pune accident
Pune Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार, ‘ससून’मधील ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांना ३० मेपर्यंत कोठडी; न्यायालयात काय घडलं?

न्यायालयाने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांचे वकील सुधीर शाह आणि जितेंद्र…

MLA Ravindra Dhangekar and Sushma Andhares Alligations on pune police over bar on the authorities
Ravindra Dhangekar On Pubs: बारमधून अधिकाऱ्यांना मिळतो हफ्ता,रविंद्र धंगेकर,सुषमा अंधारेंचा थेट आरोप

Ravindra Dhangekar: मागील आठवड्यात कल्याणीनगर येथे कार अपघातात दोन तरुणांना एका आलिशान गाडीने चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील अल्पवयीन आरोपी…

संबंधित बातम्या