फोन चार्ज करण्यासाठीचा ८०-२० नियम काय आहे? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी लगेच जाणून घ्या | Use this trick to charge mobile will increase battery life | Loksatta

फोन चार्ज करण्यासाठीचा ८०-२० नियम काय आहे? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी लगेच जाणून घ्या

बऱ्याचदा फोन चांगला असतो पण बॅटरी लवकर खराब होते, त्यामुळे त्यावर वेगळा खर्च करावा लागतो. हा खर्च टाळण्यासाठी बॅटरी लाईफ कशी वाढवता येईल जाणून घ्या.

फोन चार्ज करण्यासाठीचा ८०-२० नियम काय आहे? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी लगेच जाणून घ्या
(Photo : Freepik)

Mobile Charging Tips : मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. सकाळी उठण्यासाठी लावलेल्या अलार्मपासून दिवसभरातल्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आपण मोबाईलवर अवलंबुन असतो. त्यामुळे मोबाईलची बॅटरी लगेच संपण्याची शक्यता असते. यासाठी आपल्याला सतत चार्जर आपल्याबरोबर ठेवावा लागतो किंवा इतर कोणाच्याही चार्जरने फोन चार्ज करावा लागतो. पण मोबाईल दुसऱ्या कंपनीच्या चार्जरने चार्ज केल्यास मोबाईलची बॅटरी आणि चार्जर दोन्ही खराब होण्याची शक्यता असते. यासाठी मोबाईलबरोबर मिळालेला चार्जर वपारण्याचा सल्ला दिला जातो.

फोन चार्ज करताना जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यामुळे बॅटरी लाईफ वाढण्यास मदत होऊ शकेल. यासाठी ८०-२० हा नियम वापरला जातो. काय आहे हा नियम जाणून घ्या.

आणखी वाचा : फोन चोरी झाल्यास ॲप्पल आणि सॅमसंग युजर्सना कळणार लोकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर

प्रत्येक फोनमध्ये एक चार्ज सायकल निश्चित करण्यात आलेली असते. चार्ज सायकल म्हणजे फोनची बॅटरी पुर्ण चार्ज असताना बॅटरी पुर्णपणे संपन्याचा कालावधी. हा कालावधी खूप कमी वेळा वापरला जातो. कारण फोन चार्जिंग संपल्याने सहसा बंद होत नाही, थोडी बॅटरी कमी झाली की आपण तो लगेच चार्जिंगला लावतो. त्यामुळे या सायकलचा वापर होत नाही. याऐवजी ८०-२० नियमाचा वापर करून तुम्ही बॅटरी लाईफ वाढवू शकता.

८० – २० नियम
८०-२० नियम म्हणजे फोनची बॅटरी २० टक्क्यांवर असेल तेव्हाच तो चार्ज करायचा आणि ८० टक्के झाल्यानंतर चार्जिंग बंद करायचे. असे केल्याने तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ चांगली राहू शकेल. हा नियम वापरुन बॅटरी लाईफ वाढवता येते. तसेच जर एखादा फोन वापरला जात नसेल तरी त्याची बॅटरी ५० टक्के चार्ज करून ठेवावी, कारण खूप दिवस फोन वापरात नसेल तर त्याची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दणकट बॅटरी अन् पॉवरफुल प्रोसेसरसह लेनोव्हाचा टॅबलेट बाजारात!

संबंधित बातम्या

Reliance Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन! १४९ रुपयांपासून, २८ GB पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर
गौतम अदानींना मिळाला दूरसंचार परवाना; एडीएनएल लवकरच सुरू करणार दूरसंचार सेवा
काय आहे Netflix चे नवे प्रोफाइल ट्रान्सफर फीचर? कसे वापरायचे जाणून घ्या
Sim Card Rule: आता ‘या’ कागदपत्रांवर घेता येणार नाही सिमकार्ड; सरकार आणणार नवीन नियम; जाणून घ्या काय आहे कारण…
OnePlus: जबरदस्त बॅटरीसह एक मस्त मिड-रेंज 5G स्मार्टफोन लाँच करणार; लाँचपूर्वीच स्मार्टफोनचे तगडे फीचर्स लीक!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार