आपण फोनवर बोलत असताना मध्येच आपल्याला बीपप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या फोनमधून आवाज यायला लागतो. आपण सहजरित्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण तुम्हाला माहिती आहे का हा एक संकेत आहे ज्याद्वारे तुम्हाला सांगितले जाते की, तुमचा कॉल रेकॉर्ड करण्यात येत आहे. काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही हे ओळखू शकता. कॉल रेकॉर्ड केला जात आहे ते कसे ओळखायचे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगलकडून कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी

गुगलकडून कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. याआधी गुगल डायलर वापरणाऱ्यांना ‘कॉल रेकॉर्डिंग’ हा पर्याय उपलब्ध होता. परंतू गुगलने हे फिचर काढून टाकले आहे. गुगलच्या या निर्णयानंतर अनेक मोबाईल कंपन्यांनी त्यांचे रेकॉर्डिंग फीचर काढून टाकले. परंतु अजुनही काही मोबाईल्समध्ये कॉल रेकॉर्डिंग करता येते. तुम्ही सहजरित्या हे जाणून घेऊ शकता.

आणखी वाचा – भारताचा डिजिटल स्ट्राईक; Youtube वरील या चॅनेल्सवर घातली बंदी, एका पाकिस्तानी चॅनेलचाही समावेश

असे ओळखा कॉल रेकॉर्डिंग

जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असते तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळतात. हे संकेत ओळखले तर तुम्हाला कॉल रेकॉर्ड केला जात आहे हे कळेल. यासाठी फक्त तुम्हाला बोलताना कोणत्या वेगळ्या प्रकारचा आवाज येत आहे का यावर लक्ष द्यायचे आहे. कधीकधी फोनवर बोलत असताना आपल्याला बीपचा आवाज येतो. पण आपण स्क्रीनवर काही टाईप झाले असेल असे म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु हा कॉल रेकॉर्डिंगचा संकेत आहे. म्हणजेच जर तुम्हाला फोनवर बोलत असताना मध्येच सिंगल बीपचा आवाज आला तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे हे स्पष्ट आहे.

दुसरा संकेत म्हणजे काही फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग चालू केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सतत बीप ऐकू येत राहते. म्हणजे कॉल चालू असताना मध्ये मध्ये बीपचा आवाज येत राहतो. असा बीपचा आवाज जर तुम्हाला कॉल चालू असताना सतत येत असेल तर याचा अर्थ आहे तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. याव्यतिरिक्त काही फोन्समधून कॉल रेकॉर्डिंग सुरू झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला तसा ऑडिओ मेसेज पाठवला जातो. म्हणजेच तुम्ही कॉल वर बोलत असताना जर समोरच्या व्यक्तीने कॉल रेकॉर्डिंग सुरू केले तर तुम्हाला ऑडिओ मेसेजद्वारे याची कल्पना दिली जाते. बहुतांश मोबाईल कंपन्यांनी आता हे फिचर बंद केले आहे, तरी तुमचा कॉल कोणी रेकॉर्ड करत असेल तर हे संकेत लक्षात ठेऊन तुम्ही ते ओळखू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use this tricks to know who is recording your call pns
First published on: 18-08-2022 at 19:45 IST