Valentine’s Day: iPhone खरेदी करण्याचा विचार करताय? 'या' मॉडेलवर मिळतेय तब्बल ३० हजारांची सूट | users able to buy iPhone 14 and 14 plus at a huge discount occasion of valentine day sale | Loksatta

Valentine’s Day: iPhone खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ मॉडेलवर मिळतेय तब्बल ३० हजारांची सूट

यामध्ये ग्राहकांना बँकेच्या कार्डवर कॅशबॅक , डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत.

iphone 14 and iphone 14 plus launch yellow colour

Apple ही एक टेक कंपनी आहे. तसेच ही कंपनी आयफोन , मॅकबुक, स्मार्टवॉच आणि अन्य गोष्टींचे उत्पादन करते. या कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये iPhone 14 सिरीजचे लाँचिंग केले होते. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश आहे. या सिरीजमधील फोनच्या किंमती या ७९,९०० रुपयांपासून सुरु झाल्या आहेत. मात्र १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे आहे. या दिवसानिमित्त ऑनलाईन सेल सुरु झाले आहेत. या सेलमध्ये आयफोन १४ हा डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे.

इमॅजिन हे भारतातील Apple-अधिकृत थर्ड पार्टी विक्रेत्यांपैकी एक मोठे किरकोळ विक्रेते आहेत. आता सुरु असलेल्या व्हॅलेंटाईन डे सेलमध्ये, iPhone 14 आणि iPhone 14 Plus मोठ्या सवलतींसह मिळू शकतात. यामध्ये ग्राहकांना बँकेच्या कार्डवर कॅशबॅक , डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत.

हेही वाचा : Smartphones खरेदी करण्याचा विचार करताय?, १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट फोन

व्हॅलेंटाईन डे ऑफर

iPhone 14 भारतात १२८ जीबी स्टोरेजसह ७९,९०० रुपयांना लाँच करण्यात आला. तसेच यामध्ये वापरककर्त्यांसाठी २५६ व ५१२ जीबी स्टोरेज असणारे फोन देखील उपलब्ध आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे ८९,९०० रुपये आणि १,०९,९०० आहे. व्हॅलेंटाईन डे सेलमध्ये ऑफरमध्ये आयफोन १४ हे डिव्हाईस ४३,९०० रुपयांना वापरकर्त्यांना खरेदी करता येणार आहे.

Imagine च्या सेलमध्ये iPhone 14 ६,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. HDFC बँकेच्या कार्डद्वारे वापरकर्ते ४,००० रुपयांच्या कॅशबॅकसह फोन खरेदी करू शकतात. या ऑफर्समुळे या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत ६९,९०० रुपयांपर्यत कमी झाली आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये आयफोन १४ वर २०,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मात्र जुन्या फोनच्या मॉडेलनुसार त्याची किंमत ठरते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

iPhone 14 Plus देखील मोठ्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे. हा फोनवे या सेलमध्ये ७,००० पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. HDFC बँकेच्या कार्डावर ४,००० रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय EasyEMI च्या व्यवहारांवरही कॅशबॅक ऑफर मिळू शकते. ऑफर मधून हा फोन ७८,९००० रुपयांना खरेदी करण्याची संधी वापरकर्त्यांना आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: गुगल, फिलिप्सपाठोपाठ आणखी एका टेक कंपनीचा कामगारांना धक्का, ६६५० जणांची नोकरी जाणार

iPhone 14, iPhone 14 Plus चे फीचर्स

आयफोन १४ मधील या दोन्ही फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा यामध्ये येतो तसेच सेल्फ कॅमेरा हा १२ मगापिक्सलचा येतो. फोनमध्ये iOS 16 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. आयफोन १४ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR तर आयफोन १४ प्लसमध्ये ६.७ इंचाचा वापरकर्त्यांना मिळतो. या फोनमध्ये २० वॅटचे फास्ट चार्जिंग आणि ७.५ वॅटचे वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 17:34 IST
Next Story
WhatsApp Features: व्हाट्सअ‍ॅप घेऊन येतयं नवीन फिचर, बघून तुम्हीही माराल आनंदाने उड्या, जाणून घ्या