vijay sales offer discount on apple iphone 14 and 14 pro | Loksatta

‘या’ सेलमध्ये कमी किंमतीत iphone 14 घेण्याची संधी, जाणून घ्या ऑफर

विजय सेल्समध्ये आयफोन १४ आणि १४ प्रो वर मोठी सूट मिळत आहे. ७९ हजार ९०० चा आयफोन १४ हा ग्राहकांना सूटसह ७४ हजार ९०० रुपयांना मिळत आहे.

‘या’ सेलमध्ये कमी किंमतीत iphone 14 घेण्याची संधी, जाणून घ्या ऑफर
संग्रहित छायाचित्र

अ‍ॅपलने आपली नवी आयफोन १४ सिरीज लाँच केल्यानंतर १३ आणि १२ च्या किंमतींमध्ये मोठी घट दिसून आली आहे. त्यानंर आता सणासुदीचे दिवस असल्याने कदाचित आयफोन १४ वरही सूट मिळेल अशी अ‍ॅपलच्या चाहत्यांना आशा आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण विजय सेल्समध्ये आयफोन १४ आणि १४ प्रो वर मोठी सूट मिळत आहे. ७९ हजार ९०० चा आयफोन १४ हा ग्राहकांना सूटसह ७४ हजार ९०० रुपयांना मिळत आहे.

विजय सेल्सने दसरा सेल जाहीर केला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठी सूट मिळत आहे. जर तुम्हाला कमी किंमतीमध्ये आयफोन १४ घ्यायचा असेल तर विजय सेल तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. एचडीएफसीच्या १५ हजारांवरील क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ३ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. तसेच, एचडीएफसीच्या १५ हजारांवरील नॉन ईएमआय क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर तातडीची १५ रुपयांची सूट मिळत आहे.

(21 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक, १२ तासांपर्यंत खेळता येणार गेम! रेडमी पॅड बाजारात घालणार धुमाकूळ, जाणून घ्या किंमत)

आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर इतकी सूट

आयसीआयसीआय बॅकेच्या २० हजारांवरली क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ग्राहकाला ३ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच ग्राहकांना नॉन ईएमआय ट्रान्झॅक्शनवर देखील १ हजार ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. तर १ लाखांवरील इएमआय क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर ५ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. ही ऑफर नॉन ईएमआय ट्रान्झॅक्शनला देखील असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘या’ कंपनीने लाँच केला ७ हजारांचा स्मार्टफोन; काय आहेत फीचर जाणून घ्या

संबंधित बातम्या

Best Recharge Plan: मस्तच! ३९५ रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा लाभ घ्या; तीन महिन्याच्या वैधतेसह उपलब्ध
विश्लेषण: एलॉन मस्कच्या ट्विटरला नाकारत ब्राझीलच्या नागरिकांचं भारतीय Koo App ला प्राधान्य; दोघांमध्ये नेमका फरक काय?
मस्तच! Google चा ‘हा’ भन्नाट फीचर्स व्हॉट्सअॅपसारखं करेल काम; आता मजा होणार दुप्पट, पाहा काय आहे तुमच्यासाठी खास…
PAN CARD: तुमचे ई-पॅन कार्ड डाउनलोड करायचे आहे, तर ‘या’ स्टेप्स करा फॉलो
डेटा चोरतात ‘हे’ ४ अ‍ॅप्स; फोनमधून लवकर अनइन्स्टॉल करा, अन्यथा होईल नुकसान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”
“…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू, त्यांनी फक्त…”, आमदार संजय गायकवाड यांचं जाहीर आव्हान!
IND vs PAK: “वर्ल्डकपवर बहिष्कार…” माजी पाकिस्तानी क्रिकेटरने रमीज राजाच्या धमकीची उडवली खिल्ली
“माझ्या मुलीला बलात्काराच्या…” अनुराग कश्यपचा जीवनातील खडतर आणि चिंताजनक प्रसंगांविषयी खुलासा
“नितू, निलू आगाऊ लेकरं,” सुषमा अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “नारायण राणेंनी संस्कार…”