विवो गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहे. कंपनी केवळ आपल्या देशांतर्गत बाजारपेठ चीनमध्येच नाही तर भारतातही बजेट, मिड आणि प्रीमियम फोन ऑफर करत आहे. Vivo ने या महिन्यात भारतात Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच करण्याशी संबंधित माहिती शेअर केली होती. आता अशी माहिती मिळाली आहे की कंपनी Vivo V25 सीरीजचा आणखी एक फोन Vivo V25E वर काम करत आहे. स्मार्टफोन निर्माता Vivo V25E हँडसेट जागतिक बाजारात लॉंच करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Root My Galaxy ने IMEI डेटाबेस सूचीवर नवीन Vivo फोन पाहिला आहे. साइटवर या हँडसेटचा मॉडेल क्रमांक V2201 आहे. ही यादी याची खात्री देते की हा फोन Vivo V25E नावाने बाजारात उपलब्ध केला जाईल. या महिन्याच्या सुरुवातीला, मॉडेल क्रमांक V2201 सह फोन EEC प्रमाणपत्राच्या डेटाबेसमध्ये दिसला होता. हा फोन भारतात लॉंच केला जाईल की नाही हे सध्या स्पष्ट झाले नाही, परंतु EEC सूची सूचित करते की हा फोन लवकरच युरोपमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो.

आणखी वाचा : जुन्या टीव्हीला करा टाटा बाय-बाय! १४ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Android स्मार्ट टीव्ही

सध्या आगामी Vivo V25e स्मार्टफोनच्या फीचर्स कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण असे वृत्त आहे की Vivo V25 Pro हा फोन Vivo S15 Pro चीच रीब्रँडेड वर्जन असेल. Vivo S15 Pro मे महिन्यात चीनमध्ये लॉंच झाला होता. पण Vivo V25 बद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. Vivo V25e देखील Vivo S15e ची रीब्रँडेड वर्जन किंवा नवीन फोन असल्याबद्दल काहीही माहिती नाही.

आणखी वाचा : लॉंचपूर्वी मोठा खुलासा! Lava चा नवा फोन १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार, ४ रिअर कॅमेरे

Vivo S15e specifications

Vivo S15e स्मार्टफोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह ६. ४४ इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. स्क्रीन फुलएचडी + रिझोल्यूशनसह येते. फोन Android 11 OS आणि OriginOS Ocean UI सह येतो. सुरक्षिततेसाठी, या Vivo फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यामध्ये Exynos 1080 चिपसेट उपलब्ध आहे. Vivo S15e मध्ये १२ GB पर्यंत RAM आणि २५६ GB पर्यंत स्टोरेज आहे.
हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४७०० mAh बॅटरी आहे जी६६ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेटमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo v25e launching in india soon spotted at imei database prp
First published on: 21-06-2022 at 21:47 IST