Vivo Smartphone Offers: स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. ‘Vivo Y15s’ या स्मार्टफोनवर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन उत्तम ऑफर देत आहे. काय आहे हा ऑफर सविसतर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘Vivo Y15s’ या स्मार्टफोनवर विशेष ऑफर

Vivo Y15s या स्मार्टफोनवर Amazon India वर तब्बल ६,५०० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. मार्केटमध्ये सध्या हा स्मार्टफोन १३,९९० रुपयांमध्ये मिळत आहे. कंपनी त्यावर ३२ टक्के सूट देत आहे, त्यानंतर त्याची किंमत ९,४९९ रुपये झाली आहे. बँक ऑफर अंतर्गत हा फोन २,००० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. या ऑफरसह, फोनवर उपलब्ध एकूण सूट सुमारे ६,५०० रुपये आहे. फोनवर ८,९०० रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.

‘Vivo Y15s’ स्मार्टफोन असा आहे खास

Vivo Y15s स्मार्टपोन ८.२८ एमएम पातळ असून, याचे वजन १७९ ग्रॅम आहे. हा एक प्रीमियम डिझाइन प्रदान करतो. तसेच, हातात पूर्णपणे व्यवस्थित फिट बसतो. यामध्ये ६.५१ इंच हेलो फुल व्ह्यू डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १६००x७२० पिक्सल आहे. फोनमध्ये आय प्रोटेक्शन मोड देखील दिला आहे, जे धोकादायक ब्लू रेजला फिल्टर करते. हँडसेटमध्ये साइड फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. तसेच, फेस अनलॉकचा देखील सपोर्ट फोनमध्ये मिळतो. या फोनला तुम्ही वेव्ह ग्रीन आणि मिस्टिक ब्लू या रंगात खरेदी करू शकता.

विवोच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसर दिला असून, डिव्हाइस अँड्राइड ११ गो एडिशनवर काम करते. तसेच, मल्टी टर्बो ३.० मुळे तुम्ही अनेक तास कोणत्याही समस्येशिवाय सहज फोन वापरू शकता. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरला १३ मेगापिक्सल प्रायमरी आणि २ मेगापिक्सल सुपर मॅक्रो कॅमेरा मिळतो. कॅमेऱ्यामध्ये पॅनोरम, फेस ब्यूटी, व्हिडिओ, लाइव्ह फोटो, टाइम लॅप्स, प्रो मोड सारखे फीचर्स मिळतात. तसेच, फ्रंटला ऑरा स्क्रीन लाइटसह ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo y15s is available at a discount of rs 6500 on amazon india pdb