मेटाच्या व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या लोकप्रिय ॲप्सची सेवा मध्यरात्री खंडीत झाली होती. जगभरात गोंधळ उडाल्यानंतर दोन्ही ॲप्सच्या सेवा सुरळीत करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री ११.४५ वाजल्यापासून जगभरातील अनेक देशांमध्ये दोन्ही ॲप्सच्या सेवा खंडीत करण्यात आल्या होत्या. यावेळेत अनेक युजर्सनी आपले व्हॉट्सॲप अकाऊंट तपासण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मेसेज दिसत नव्हते. जे लोक लॅपटॉप किंवा संगणकावरून वेब ब्राऊजरद्वारे व्हॉट्सॲप वापरतात तिथूनही लॉग आऊट झालं होतं.

स्क्रोल करताना अचानक पॉर्नसारखे व्हिडीओ का दिसतात? मेटाच्या माजी सहसंस्थापकाच्या पोस्टमुळे नेटकरी भडकले

मेटा कंपनीचे फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इन्स्टाग्राम हे ॲप्स जेव्हा जेव्हा बंद होतात, तेव्हा एक्सवर युजर्सच्या मिम्सचा पाऊस पडतो. यावेळी व्हॉट्सॲप कडूनच थेट एक्सवर पोस्ट टाकून खुलासा करण्यात आला. मध्यरात्री व्हॉट्सॲपने निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले, “काही युजर्सना व्हॉट्सॲप वापरण्यात अडचणी येत आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्यावर काम करत असून लवकरच पूर्ण क्षमतेने व्हॉट्सॲप सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शक्यतितक्या लवकर सेवा पूर्ववत केली जाईल.”

गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

मेटाचे ॲप बंद होण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. हल्ली मार्च महिन्यात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्सची सेवा खंडीत झाली होती. युजर्स ॲप्समध्ये गेल्यानंतर अचानक लॉग आऊट होत होते. लॉग आऊट झाल्यानंतर काहींना पुन्हा लॉग इन करण्याचा पर्याय दाखविला जात नव्हता. तर काहींना लॉग इन करताना ऑथेंटिकेशन कोड येण्यात अडचणी येत होत्या. यानंतर एक्सवर अनेकांनी मिम्स आणि तक्रारीच्या स्वरुपात अडचणी मांडल्यानंतर काी वेळाने मेटाचे ॲप्स सुरळीत सुरू झाले.