कुटुंबातील सदस्यांबरोबर संवाद साधताना वा मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना आपण एखादी गोष्ट खरेदी करायची आहे, असे सहज बोलून जातो. त्यानंतर आपण स्मार्टफोनमधील एखादे ॲप ओपन केले की, त्याच्याशी संबंधित काही जाहिराती दिसू लागतात. तेव्हा अनेकदा वापरकर्त्यांना आश्चर्य वाटते आणि ते म्हणतात की, गूगल आपलं सर्व बोलणं ऐकतं वाटतं?… तर आज याचसंबंधित एक बातमी समोर येत आहे. गूगल कंपनी एक खटला निकाली काढण्यासाठी वापरकर्त्यांचे अब्जावधी गूगल ब्राउजिंग डेटा रेकॉर्ड डिलीट करणार आहे. कारण वापरकर्त्यांकच्या इंटरनेट वापराचा गुप्तपणे मागोवा घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर संपूर्ण प्रकरण काय आहे ते या जाणून घेऊ या.

वापरकर्त्यांकडून असा आरोप करण्यात आला आहे की, गूगल प्रायव्हेट ब्राउझिंग वापरणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवत नाही तर त्याचा मागोवा घेत असते. त्यामुळे गूगल वापरकर्त्यांच्या मित्र-मैत्रिणींबद्दलची माहिती, त्यांचे आवडते खाद्यपदार्थ, छंद, कोणती गोष्ट खरेदी करायची आहे ते ऑनलाइन शोधणाऱ्या प्रत्येक गोष्टी इतर ॲप्सवर याची माहिती दर्शविताना दिसतात.

raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

१ एप्रिल रोजी कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला होता. तसेच यूएस जिल्हा न्यायाधीश यव्होन गोन्झालेझ रॉजर्स यांच्याकडून या खटल्याबाबत मंजुरी येणे अद्याप बाकी आहे. तसेच फिर्यादींच्या वकिलांनी या कराराचे मूल्य पाच अब्ज डॉलरपेक्षा जास्त आणि ७.८ अब्ज डॉलर इतके सांगितले आहे; पण गूगल कोणतीही नुकसान भरपाई देण्यास नसला तरीही वापरकर्ते वैयक्तिकरीत्या नुकसानीसाठी कंपनीवर दावा दाखल करू शकतात.

हेही वाचा…सुंदर पिचाई यांनी Gmail चा सांगितला ‘तो’ २० वर्षांचा प्रवास; पोस्ट शेअर करीत म्हणाले, ‘हा प्रँक…’

तर या सेटलमेंट अंतर्गत गूगल कंपनी Private ब्राउझिंगनमध्ये वापरकर्त्यांची कोणती माहिती जमा केली आहे याबद्दल शोध घेईल आणि थर्ड पार्टी कुकीज ब्लॉक करू देईल. ही प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, असे सांगण्यात येत आहे.

गूगलचे प्रवक्ते जोस कास्टनेडा म्हणाले, “कंपनीला हा खटला निकाली काढण्यात आनंद झाला आहे. कारण – ते नेहमीच या निर्णयाला योग्य मानत होते. जेव्हा वापरकर्ते Incognito mode वापरतात तेव्हा आम्ही त्यांचा डेटा कधीच दुसऱ्या कोणत्या गोष्टीशी जोडत नाही. पण, आम्ही वापरकर्त्यांचा जुना तांत्रिक डेटा हटविण्याच्या बाबतीत आम्ही आनंदी आहोत; जो कधीही एखाद्या व्यक्तीशी संबंधित नव्हता आणि कधीही कोणत्या पर्सनल कामासाठी वापरला गेला नाही.”

म्हणजेच गूगलने सेटलमेंटच्या अटींना सहमती दर्शविली असली तरीही त्यांनी वापरकर्त्यांचे व फिर्यादींचे आरोप मान्य केले नाही आहेत. गूगलचे म्हणणे आहे की, डेटा गोळा करण्याबाबत फिर्यादींचे आरोप खोटे आहेत.