WhatsApp can be used even without internet; Learn awesome tricks | Loksatta

WhatsApp Trick : इंटरनेट नसतानाही वापरता येणार व्हॉट्सअ‍ॅप; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

एका व्हॉट्सअ‍ॅप ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकाल.

WhatsApp Trick : इंटरनेट नसतानाही वापरता येणार व्हॉट्सअ‍ॅप; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक
ही ट्रिक काय आहे आणि ती कशी काम करते ते जाणून घेऊया. (File Photo)

WhatsApp हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे, ज्यामध्ये तुम्हाला चॅटिंगपासून कॉलिंगपर्यंत सर्व प्रकारची वैशिष्ट्ये दिली जातात. या प्लॅटफॉर्मची सर्व वैशिष्ट्ये सामान्यतः इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने चालतात. परंतु काहीवेळा असे होते की आपल्या फोनमध्ये इंटरनेट नसते. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप वापरणे अशक्य होते. आज आपण अशा एका व्हॉट्सअ‍ॅप ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकाल. ही ट्रिक काय आहे आणि ती कशी काम करते ते जाणून घेऊया.

आता तुम्ही विचार करत असाल की तुम्ही इंटरनेटशिवाय आपण व्हॉट्सअ‍ॅप कसे वापरू शकतो. त्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज भासणार नाही. या ट्रिकच्या मदतीने आपण इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप अधिकृतपणे वापरू शकतो.

Income Tax Return: ITR भरण्यास उशीर झाल्यावरही भरावा लागणार नाही दंड; जाणून घ्या तपशील

इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप सहज वापरता येते आणि त्याचा पर्याय तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप स्वतः देतो. खरं तर, मल्टी-डिव्हाइस सपोर्टच्या मदतीने, एकदा कनेक्ट केल्यानंतर, तुमच्या फोनवर इंटरनेट नसतानाही तुम्ही तुमच्या डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरू शकता. फोनमध्ये इंटरनेट नसतानाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वेबवर मेसेज पाठवू आणि प्राप्त करू शकता. हे फीचर वापरण्यासाठी म्हणजेच इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला मल्टी-डिव्हाइस बीटा पर्याय निवडावा लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-07-2022 at 18:10 IST
Next Story
आता स्मार्टफोनऐवजी साबण मिळणार नाही! Flipkart ने आणले हे खास फिचर