व्हॉट्सॲप ॲपवर वैयक्तिक, तर ऑफिसचे असे अनेक ग्रुप्स आणि चॅट्स असतात. त्यामुळे कधी कधी ऑफिसचा मेसेज तर कधी वैयक्तिक संदेशला (Msg) रिप्लाय देण्यात अनेकांचा गोंधळ उडतो. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांना आवडते चॅट फिल्टर करण्याची परवानगी देणार आहे. व्हॉट्सॲप महत्त्वाच्या संभाषणांना (Chats) प्राधान्य देण्यासाठी एक “कस्टम चॅट फिल्टर” फीचर लाँच करणार आहे.

व्हॉट्सॲप प्रियजनांचे किंवा महत्त्वाच्या संभाषणाचे मेसेज वापरकर्त्यांकडून दुर्लक्ष (मिस) होऊ नये म्हणून हे फीचर घेऊन येत आहे. व्हॉट्सॲप आधीपासून आवडत्या चॅट्स पिन करण्याचा पर्याय देत असताना, हे फीचर आणखीन तीन संपर्कांपुरते मर्यादित असणार आहे; व्हॉट्सॲप आवडत्या संपर्कांना प्राधान्य देण्यासाठी डिझाइन केलेल्या नवीन कस्टम ‘चॅट फिल्टर’ फीचरवर सध्या काम करत आहे.

हेही वाचा…स्वस्त स्मार्टवॉच कंपन्यांना सॅमसंगची टक्कर! गॅलॅक्‍सीचा नवीन फिटनेस ट्रॅकर लाँच; पाहा जबरदस्त फीचर्स

Wabetainfo च्या मते नवीन फीचर नवीन TestFlight बीटा अपडेटमध्ये दिसून आले. चॅट फिल्टर फीचर हे व्हॉट्सॲपने यापूर्वी घोषित केलेल्या एका फीचरचे अपडेटेड व्हर्जन आहे, जे आवडते संपर्क चिन्हांकित (Mark ) करण्याचा पर्याय देणार आहे. या नवीन फिल्टरसह वापरकर्ते त्यांच्या आवडत्या संपर्कांवर आधारित चॅट्स फिल्टर करू शकतात; ज्यामुळे त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या संभाषणांमध्ये प्रवेश करणे सोयीस्कर होईल आणि त्यांना सगळ्यात आधी प्राधान्य मिळेल. तरीसुद्धा हे लक्षात घेण्यासारखे आहे की, चॅट फिल्टर फीचर अद्याप लाँच झाले नाही आहे आणि ते बीटामध्ये आणि नंतर सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल