सॅमसंग या भारतातील सर्वांत मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने त्‍यांचे नवीन फिटनेस ट्रॅकरसहित ‘गॅलॅक्‍सी फिट३’ स्मार्टवॉच लाँच केले आहे. हा नवीन फिटनेस ट्रॅकर हेल्‍थ मॉनिटरिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे; जो वापरकर्त्यांना उत्तम फिटनेस, आरोग्‍यदायी जीवनशैलीचा अनुभव देईल. गॅलॅक्‍सी फिट३ हे स्मार्टवॉच सॅमसंगचे नवीन वेअरेबल डिव्हाइस आहे. या फिटनेस ट्रॅकरद्वारे वापरकर्ते दररोज सकाळच्या व्‍यायामापासून ते रात्री झोपेपर्यंत त्‍यांच्‍या आरोग्‍यविषयीच्या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवू शकतात. चला तर या फिटनेस ट्रॅकरमध्ये आणखी कोणती फीचर्स आहेत ते पाहू.

फीचर्स :

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Samsung launch of A Series Galaxy A55 5G and Galaxy A35 5G with awesome innovations With Offers
यूट्यूब प्रीमियम अन् आकर्षक ऑफर्ससह ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री; जाणून घ्या किंमत

गॅलॅक्‍सी फिट३ वॉच टिकाऊ व कॉम्‍पॅक्‍ट ट्रॅकरसह स्‍टायलिश डिस्‍प्‍ले, ॲल्‍युमिनियम बॉडी व १.६ इंच डिस्‍प्‍लेसह डिझाइन करण्‍यात आले आहे; जे पूर्वीच्‍या मॉडेलपेक्षा ४५ टक्‍के मोठे आहे. त्यामुळे वापरकर्त्‍यांना क्षणात आरोग्यविषयक सविस्तर माहिती तपासणे शक्य होणार आहे. गॅलॅक्‍सी फिट३ वजनाने वॉच हलके व स्लिक आहे. ते मनगटावर व्यवस्थित फिट बसत असल्यामुळे दररोज वापरता येऊ शकते.

ग्राहकांसाठी हा फिटनेस ट्रॅकर का ठरेल खास :

नवीन लाँच केलेल्या फिटनेस ट्रॅकरची किंमत ४,९९९ रुपये असणार आहे. यामध्ये ग्रे, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड असे कलर तुम्हाला मिळू शकतात. गॅलॅक्‍सी फिट३ डिवाईसमधील बॅटरी जवळपास १३ दिवस चालू शकते. वापरकर्ते १०० हून अधिक वॉचफेस निवडत फिटनेस ट्रॅकर अधिक स्‍टायलिश तर वॉच वॉलपेपरवर स्‍वत:चा फोटो सुद्धा सेट करता येऊ शकतात. वापरकर्ते त्‍यांच्या फॅशननुसार दररोज वन-क्लिक बटनासह फिटनेस ट्रॅकरचे बॅण्‍ड्स मिक्‍स-मॅच करून घालू शकतात.

वापरकर्ते रात्रभर आरामात वॉच परिधान करू शकतात. हे ट्रॅकर ग्राहकांच्या ऑक्सिजन पातळ्यांवर देखरेख ठेवते. दिवसभर दैनंदिन क्रियाकलापांवर तर रात्री झोपेची वेळ समजून घेऊन त्यांच्या आरोग्यानुसार सकारात्‍मक बदल करण्याचे उपाय देखील सुचवते .यामध्ये ५एटीएम रेटिंग आणि आयपी६८-रेटेड पाणी व धूळपासून संरक्षण करतात ; म्‍हणजेच वापरकर्ते कोणत्‍याही वातावरणामध्‍ये हे फिटनेस ट्रॅकर सहज परिधान करू शकतात. गॅलॅक्‍सी फिट३ वापरकर्त्‍यांना हृदयाचे ठोके (हार्ट रेट) यांची माहिती देण्‍यासह त्‍यांच्‍या एकूण आरोग्‍याबाबत संपूर्ण माहिती देतो.

हेही वाचा…Blue Aadhaar card: लहान मुलांचे आधार कार्ड काढायचंय ? अर्जापासून ते कागदपत्रांपर्यंत… जाणून घ्या सविस्तर 

गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टमध्‍ये सुरक्षित व कनेक्‍टेड राहा :

वापरकर्त्‍यांना सुरक्षितता प्रदान करण्‍यासाठी गॅलॅक्‍सी फिट३ मध्‍ये फॉल डिटेक्‍शन आणि इमर्जन्‍सी एसओएस या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ॲब्‍नॉर्मल फॉल ओळखताच गॅलॅक्‍सी फिट३ वापरकर्त्‍यांना वेळेवर वैद्यकीय साह्य मिळण्‍यासाठी आपत्‍कालीन सेवांना कॉल करण्‍याचा पर्याय देईल . वापरकर्ते आपत्‍कालीन स्थितीत असल्‍यास साइड बटन पाच वेळा प्रेस करत त्‍वरित एसओएस पाठवू शकतात.

गॅलॅक्‍सी फिट३ वापरकर्ते गॅलॅक्‍सी फिट३ चा त्‍यांच्‍या मनगटावरून कंट्रोलर म्‍हणून वापर करू शकतात. स्मार्टवॉचमध्ये कॅमेरा रिमोटसह टाइमर्स सेट करून देईल, गेम्‍स खेळणे शक्य होईल. तर सोशल मीडियाचाही आनंद ग्राहक घेऊ शकतील. स्‍मार्टफोन सापडत नसेल तर वापरकर्ते गॅलॅक्‍सी फिट३ वरील फाइण्‍ड माय फोन फीचर्ससह सहजपणे स्‍मार्टफोन शोधू शकतात. अश्या भन्नाट फीचर्ससह सॅमसंगचा हा फिटनेस ट्रॅकर भारतात लाँच झाला आहे.