यूएसबी टाइप सी पोर्टसह जगातील पहिल्या वॉटरप्रूफ आयफोनचा होणार लिलाव; जाणून नेमकं काय आहे

जगातील पहिला पूर्णपणे वॉटरप्रूफ आयफोन असल्याचा दावा केला जात आहे.

Water_Proof_Iphone
यूएसबी टाइप सी पोर्टसह जगातील पहिल्या वॉटरप्रूफ आयफोनचा होणार लिलाव; जाणून नेमकं काय आहे (Photo- Youtube Video Grab)

अ‍ॅप्पलने आपल्या आयफोनवर लाइटनिंग पोर्ट राखून ठेवला आहे. त्यात अनेक अभियंत्यांनी यूएसबी टाइप सी पोर्ट करून स्वतःचे बदल केले आहेत. यापैकी एका आयफोनचा आता आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्यासह लिलाव होणार आहे. हा जगातील पहिला पूर्णपणे वॉटरप्रूफ आयफोन असल्याचा दावा केला जात आहे. हा आयफोन Gernot Jöbstl यांनी विकसित केला आहे. यूट्यूबवरील व्हिडिओत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या फोनची निर्मिती अभियांत्रिकी विद्यार्थी केन पिलोनेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन केली आहे. अलिकडेच त्याने आयफोन एक्सवर यूएसबी टाइप सी पोर्ट स्थापित केला होता. यात Jöbstl यांनी एक पाऊल पुढे जात वॉटरप्रुफ फोन तयार केला आहे. यासाठी त्याने स्वत:च्या आयफोन एक्सवर यशस्वी प्रयोग केला.

Jöbstl यांनी यासाठी आयफोनमध्ये वॉटरप्रूफ यूएसबी टाइफ सी पोर्ट वापरला. त्याचबरोबर काही सुपर ग्लू डिव्हाइसच्या आत बाजूस वापरले. त्यानंतर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याने वाहत्या पाण्याखाली फोन ठेवून वॉटरप्रूफ असल्याचं सिद्ध करून दाखवलं. इतकं पाणी टाकूनही फोन व्यवस्थितरित्या सुरु असल्याचं दिसत आहे. Jöbstl ने Type-C केबल वापरून फोनला लॅपटॉपशी कनेक्टही केलं आणि पोर्टचे कार्य देखील दाखवलं. iPhone X लॅपटॉपद्वारे चार्ज होताना व्हिडिओत दिसत आहे. तसेच त्याची माहिती लॅपटॉपवर देखील प्रदर्शित होत आहे. या फोनचा १९ जानेवारीला लिलाव होणार असून यामागच्या संकल्पेनाचा पुरावा देखील दिला जाणार आहे. Jöbstl ने त्याच्या युट्यूब व्हिडिओमध्ये नमूद केले आहे की, तो नमूद केलेल्या तारखेला “जगातील पहिल्या वॉटरप्रूफ Usb-C iPhone” चा लिलाव करणार आहे. या लिलावाची माहिती त्याच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिली जाईल.

वॉटरप्रुफ आयफोनच्या किंमतीबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल. तर Jöbstl याने पिलोनेलच्या यूएसबी टाइप सीकडून प्रेरणा घेत हा फोन तयार केला. पिलोनेलचा यूएसबी टाइफ सी फोन जवळपास ६४ लाखांना लिलावात विकला गेला. यावरून या फोनचा लिलाव किती लागेल याचा अंदाज बांधता येईल. वॉटरप्रूफ फोन असल्याने लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. मात्र हा फोन जरी विकला गेला तरी त्याला वॉरंटी नसेल हे लक्षात घेणंही गरजेचं आहे. कारण या फोनचं संपूर्ण हार्डवेअर निर्मात्याने बदललं आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World first waterproof iphone with usb type c port auction soon rmt

Next Story
जिओचा सर्वात आकर्षक प्लॅन! १०० जिबी डेटा आणि मोफत Netflix, Disney+ Hotstar आणि बरेच काही
फोटो गॅलरी