स्मार्टफोन, अँड्रॉइडच्या नवनवीन आवृत्या, टॅब्लेट-फॅब्लेटचे घोडदौड, हाय फंडू टीव्ही, टोटल फील देणारं होम थिएटर यांनी सरतं वर्ष गाजवलं. दर आठदिवशी लॉन्च होणाऱ्या एकापेक्षा एक स्मार्टफोन्सनी ग्राहकांना पेचात पाडलं. अॅपल-सॅमसंग-सोनी या प्रसिद्ध ब्रँण्डसच्या बरोबरीने झोलो, झिओमी, अॅस्युस, अशा अजब नावाचे गजब गॅझेट्स टेक्नोबाजारात दाखल झाले. नावापासूनच विचित्रपणा असलेल्या या कंपन्यांच्या प्रॉडक्टसबाबत टेक्नोग्राहक साशंक होते मात्र प्रस्थापित ब्रँण्डची सगळी फिचर्स देणारे, आणि तेही परवडणाऱ्या किंमतीत तसेच लुक, अफ्टर सेल सव्र्हिस या गोष्टींचीही काळजी वाहण्याच्या भूमिकेमुळे या चिनीटेक्नो ड्रॅगनने भारतात आपले बस्तान बसवले. जुने जाऊ द्या मरणालागुनी या केशवसुतांच्या उक्तीनुसार नव्या वर्षांत टेक्नोसॅव्हींना कामकाज अतिसुलभ करून देणारी गॅझेट्स सज्ज झाली आहेत. त्यांच्या आगमनाची वर्दी सरत्या वर्षांतच देण्यात आली होती. आपल्या सगळ्यांचं आयुष्य गॅझेट्समय झालं आहेच. २०१५ च्या निमित्ताने आपण मोहमयी गॅझेट्सच्या आणखी मोहात अडकण्याची शक्यता वाढली आहे. अशाच गॅझेट्सचा घेतलेला वेध
आयवॉच
आयबीएम १२ अटॉम मेमरी स्टोरेज
माहिती साठवण ही प्रत्येक टेक्नोसॅव्ही व्यक्ती तसेच संस्थेची मूलभूत गरज असते. सॉफ्टवेअर प्रणाली क्षेत्रातील मातब्बर नाव असलेल्या आयबीएमने मेमरीविषयक सर्व चिंता मिटतील अशी तरतूद केली आहे. एका विशेष यंत्रणेद्वारे १२ अटॉम एवढय़ा परिमाणातच मेमरी स्टोरेज करता येई शकेल. सध्याच्या हार्डडिस्क यंत्रणेच्या १०० पट कमी स्पेसमध्ये प्रचंड डेटा साठवण्याची सुविधा आयबीएम देणार आहे. सध्या प्रयोगशाळेत या व्यवस्थेच्या चाचण्या सुरू आहेत. नव्या वर्षांच्या उत्तरार्धात आयबीएम मेमरी स्टोरेज क्षेत्रात क्रांती घडवणार आहे.
ऑक्युलस रिफ्ट
गेमिंग मंडळींसाठी नवनवे गॅझेट्स बनवणारी कंपनी. भन्नाट कल्पनाविष्कार मांडणाऱ्या या कंपनीने प्रभावित होऊन फेसबुकचा संस्थापक असलेल्या २ दशलक्ष डॉलर्स एवढय़ा प्रचंड रकमेला ही कंपनीच विकत घेतली. नव्या वर्षांत ही कंपनी गेमिंग संकल्पनेला नवा आयाम देणारे गॅझेट आणण्याचे त्यांनी योजले आहे. गेमसह सोशल नेटवर्किंग, इंटरअॅक्टिव्ह फिल्म्स, व्हच्र्युअल कॉन्सर्ट्स अशा मेजवानीचा आस्वाद
सॅमसंग फोल्डिंग फोन
गॅलॅक्सी ग्रँडसह स्मार्टफोनची टेक्नोबाजारात धमाल उडवून देणारा ब्रँण्ड म्हणजे सॅमसंग. फोन म्हणजे नोकिया असे समीकरण असताना अॅप्स, मॅप्स, डेटा स्टोरेज, व्हिडिओ, गाणी, रेडिओ असे पॅकेज देणारा फोनची निर्मित्ती करत सॅमसंगने अँड्रॉइड प्रणालीच्या फोनबाजारात मुसंडी मारली. रेल्वे, बस तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नजर टाकल्यास सर्वाधिक स्मार्टफोन्स सॅमसंगचेच दिसतात. नवीन वर्षांत आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी सॅमसंग फोल्डिंग फोनसह अवतरणार आहे. नवीन वर्षांत फॅब्लेट, गॅलॅक्सी गिअर यांच्यासह फोल्िंडग फोनसाठी तंत्रज्ञांची जोरदार तयारी सुरू असल्याचे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ क्वान ओह ह्युन यांनी स्पष्ट केले आहे.
स्मार्टफोनही तय्यार
नवीन वर्षांत आपल्या ग्राहकांना अधिकाअधिक संतुष्ट करण्यासाठी स्मार्टफोन निर्मित्ती कंपन्यांनी कंबर कसली आहे. एचटीसीने बोस या ऑडिओ क्षेत्रातील नामवंत कंपनीशी टायअप करत ग्राहकांना ऐकण्याचा नवा अनुभव देण्यासाठी तयारी केली आहे. एचटीसी वन एम ९ असे या मॉडेलचे नाव असून, मार्च महिन्यात हा फोन लॉन्च होण्याची शक्यता आहे.
सॅमसंगने गॅलॅक्सी एस-६ या नव्या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगच्या तयारीत आहे. संपूर्ण मेटलचा, बारीक, तगडं रिझोल्युशन असणारा अँड्रॉइड लॉलिपॉप ही अद्ययावत प्रणाली पुरवणारा हा फोन सॅमसंगच्या शिरपेचातला आणखी एक मानाचा तुरा असणार आहे.
सोनी एक्सपिरिआ झेड४- सुपरफास्ट प्रोसेसर आणि कॅमेरा अपग्रेड या गुणवैशिष्टय़ांसह सोनी आपला पुढचा फोन लॉन्च करणार आहे.
मायक्रोसॉफ्ट ल्युमिआ १०३०- नोकियाची सूत्रं हाती घेतल्यानंतरचा मायक्रोसॉफ्टचे हा पहिलाच आविष्कार असणार आहे. तब्बल ५० मेगापिक्सल कॅमेरा एवढय़ा प्रचंड क्षमतेच्या कॅमेऱ्याचा हा फोन छायात्रिचकार मंडळींची उत्सुकता ताणणारा आहे.
आयट्विन कनेक्ट
न्यू वायफाय स्टँडर्ड
आपल्या डिव्हाइसमध्ये माहितीजालाची गंगा विनावायरद्वारा आणण्याची व्यवस्था म्हणजे वायफाय. सध्याच्या ८०२.११ एसी, ११ एडी आणि ११ एएच या स्टँडर्डमध्येच बदल होणार असून यामुळे माहिती संक्रमणाचा वेग वाढणार आहे.
गुगल ग्लास