* अॅप डाउनलोड करताना अॅप परमिशन्स विचारल्या जातात. याचा अर्थ काय? त्यापासून काही धोका असतो का? रवींद्र नाईकवडे
* गुगल प्लेवरून अॅप इन्स्टॉल करताना आपल्याला अॅप परमिशनची एक खिडकी दिसते. यामध्ये आपण एखादे अॅप इन्स्टॉल करत असताना आपल्या मोबाइलमधील कोणकोणती माहिती वापरण्याचे अधिकार या अॅप कंपनीला देतो याची यादी असते. आपण ते सर्व न वाचता अॅक्सेप्ट करून मोकळे होतो. काही अॅप्समध्ये त्या अॅपला आवश्यक नसलेल्या गोष्टींचीही परवानगी मागितली जाते. उदाहरणार्थ एखाद्या गेमच्या अॅपमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट्सची माहिती घेतात. पण प्रत्यक्षात गेम खेळण्याचा आणि कॉन्टॅक्ट्सचा काहीच संबंध नसतो. तसेच एखाद्या अलार्म अॅपला तुमचे संदेश वाचण्याची गरज नसते. पण अनेक अलार्म अॅप्समध्ये संदेशासाठीची परवानगी घेतली जाते. यामुळे अशी अनावश्यक माहिती अनोळखी कंपन्यांना जाऊ नये यासाठी अॅप परमिशन्स नक्की वाचून घ्या. आपण जे अॅप घेत आहोत त्या अॅपला खरोखरीच या सर्व गोष्टींची गरज आहे का हेही पडताळून पाहा. कारण गुगल प्लेवरील सर्वच अॅप सुरक्षित असतात असे नाही. तसेच एखादे नवीन अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्या अॅपचे रेटिंग तसेच त्याच्यावर वापरकर्त्यांच्या आलेल्या कमेंट्स आपण सहसा वाचत नाही. पण जर त्या वाचल्या तर आपल्याला नक्कीच अॅपविषयी काही माहिती मिळू शकते.
तंत्रस्वामी
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2016 रोजी प्रकाशित
टेक-नॉलेज : अॅप परमिशन्सचा अर्थ काय?
आपण जे अॅप घेत आहोत त्या अॅपला खरोखरीच या सर्व गोष्टींची गरज आहे का हेही पडताळून पाहा.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 19-07-2016 at 00:01 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the meaning of the app permission