उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई-ठाण्यातील बरेच जण बाहेरगावी जातात. त्यातील बहुतांश आपल्या मूळ गावी म्हणजेच मुलखात जाणे पसंत करतात. साहजिकच रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा एप्रिल महिन्यात अक्षरश: ओसंडून वाहत असतात. रेल्वे प्रशासन उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त (ग्रीष्मकालीन) काही जादा गाडय़ा दरवर्षी सोडते. मात्र प्रवाशांची संख्या त्यापेक्षा किती तरी अधिक असते. त्यामुळे कसेबसे लोंबकळत प्रवास करीत प्रवाशांना गाव गाठावे लागते. सध्या कल्याण स्थानकात अशा प्रवाशांची एकच झुंबड उडालेली दिसते.
दीपक जोशी
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2016 रोजी प्रकाशित
इन फोकस : लांब पल्ल्याचा लोंबकळता प्रवास
रेल्वे प्रशासन उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त (ग्रीष्मकालीन) काही जादा गाडय़ा दरवर्षी सोडते.

First published on: 27-04-2016 at 05:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Long distance train picture