सुरेश पुजारी टोळीकडून जिवे मारण्याची धमकी
बदलापुरातील विवादित व राष्ट्रवादीतून निलंबित झालेला नगरसेवक आशीष दामलेकडे कुख्यात गुंड सुरेश पुजारी याने २ कोटींच्या खंडणीची मागणी केली असून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे बदलापुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास सुरेश पुजारीने बदलापुरातील नगरसेवक दामले याला फोन करून दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे.
तुझ्या वडिलांशी बोलून घे मी दोन कोटींची मागणी केली आहे आणि तुझ्यावरही माझे लक्ष असून माझी माणसे बदलापुरात तुझ्यावर लक्ष ठेऊन आहेत, पैसे न दिल्यास जिवे मारू अशी धमकी दामले याला दिली असून याप्रकरणी दामले याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात पुजारीच्या विरोधात तक्रार केली असून बदलापूर पश्चिम पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याचे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक वांढेकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2015 रोजी प्रकाशित
नगरसेवक दामलेकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी
कुख्यात गुंड सुरेश पुजारी याने २ कोटींच्या खंडणीची मागणी केली असून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 23-09-2015 at 00:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi pujari gang demand two million ransom from ncp suspended corporator