हरयाणामधली दोन वर्षांची चिमुकली अमायरा गुलाटी आपल्या असामान्य स्मरणशक्तीनं देशवासीयांचं लक्ष वेधून घेत आहे. अमायरा एवढीशी असली तरी तिची अफाट स्मरणशक्ती पाहून सगळेच थक्क झाले आहे. कारण अमायराला राज्यांच्या राजधान्या अगदी तोंडपाठ आहे. अमायराला भारतातल्या कोणत्याही राज्याच्या राजधानीविषयी विचारा ही चिमुकली अगदी चटकन नाव सांगते, त्यामुळे या चिमुकल्या अमायराचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थात लहानग्या अमायराच्या  काही शब्दांचे उच्चार अजूनही अस्पष्ट असले तरी तिनं अनेकांना आश्चर्यचकित करून सोडलं आहे. लहानग्या अमायराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 year old can recite the names of all indian state capitals