देशाची सेवा करण्याच्या ध्येयाने वेडा झालेला तो तरुण…अवघ्या १७ व्या वर्षी अभ्यास करुन राष्ट्रीय संरक्षण संस्थेत प्रवेश घेतो. इतकेच नाही, तर त्याननंतर बाहेर पडल्यावर तो लगेचचे सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजूही होतो. इतक्या लहान वयात आणि राजस्थानातील पहिला लेफ्टनंट झाल्याचा मान मिळाला आहे राजस्थानच्या आदित्य नागल याला.
आदित्यने आपले शालेय शिक्षण राजस्थानमध्येच पूर्ण केले. त्यानंतर त्याने १२ वी नंतर आदित्यने एनडीएची प्रवेश परीक्षा दिली. त्यात तो यशस्वी झाला आणि ४ वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्याने आपले आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्णही केले. त्याचे आई वडिल दोघेही सरकारी शिक्षक आहेत.
त्याची मोठी बहीण संरक्षण मंत्रालयात सेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होती. त्यानंतर या पदाचा राजीनामा देऊन ती इन्कम टॅक्स ऑफीसर म्हणून रुजू झाली. आता ती अहमदाबाद येथे कार्यरत आहे. आदित्यने आपल्या बहीणीकडून सैन्य दलात जाण्याची प्रेरणा घेतली आहे. आदित्य अभ्यासाबरोबर घोडेस्वारीही अतिशय उत्तम करतो. एनडीएच्या परीक्षेसाठी आदित्यने आपल्या बहीणीकडे दिल्लीला जाऊन केवळ १५ दिवसांत या परीक्षेची तयारी केली होती आणि त्यात तो यशस्वीही झाला.