आई-वडील आपल्या मुलांना जीवाचं रान करून वाढवतात. पण काही मुलं मात्र मोठी झाल्यावर याच आई वडिलांना घरातून बाहेर हाकलवायला मागे पुढे पाहत नाही. पण आता आम्ही तुम्हाला अशा आईबद्दल सांगणार आहोत, जी आपलं घर सोडून मुलासोबत वृद्धाश्रमात राहत आहे.

अॅडा केईटिंग असं या वृद्ध महिलेचं नाव असून त्या ९८ वर्षांच्या आहेत, तर त्यांचा मुलगा टॉम हा ८० वर्षांचा आहे. गेल्या काही वर्षांपासून टॉम हे वृद्धाश्रमात राहत आहेत. त्यांनी लग्न केलं नसल्यामुळे उतारवयात त्यांची काळजी घेणारे कोणीच नव्हते. त्यामुळे टॉम गेल्या काही वर्षांपासून लिव्हरपूलमधल्या वृद्धाश्रमात राहत आहेत. काही दिवसांनी आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी राहतं घर सोडून अॅडीही तिथेच राहायला आल्या.  यापूर्वी असा प्रकार नक्कीच कोणी पाहिला नसावा. त्यामुळे सगळ्यांना अॅडा आणि टॉमच खूप कौतुक वाटतं. अॅडा वृद्धापकाळानं खूप थकल्या असल्या तरी त्या शक्य तितकी टॉम यांची काळजी घेतात.

‘लपवण्याची वेळ निघून गेली’, अॅसिड हल्ल्यातील पीडितेनं शेअर केला सेल्फी

Video : एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारे रॅप साँग पाहिलंत का?