कधी कुणाचे नशीब पालटेल, सांगता येत नाही. एक बस ड्रायव्हर चिकन कबाब खरेदी करायला गेला आणि चक्क दहा कोटींचा मालक बनला. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? पण हे खरेय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना ब्रिटनच्या लीसेस्टर शहरातील आहे. मिरर यूकेच्या एका रिपोर्टनुसार, ५१ वर्षीय बस ड्रायव्हर प्रवासादरम्यान एका कबाब शॉपवर थांबला आणि त्याने चिकन कबाबची ऑर्डर दिला. चिकन कबाब यायला वेळ होता म्हणून टाइमपाससाठी त्याने जवळच्या लॉटरी शॉपमधून एक तिकीट खरेदी केले आणि त्याला चक्क दहा कोटी २५ लाख रुपयांची लॉटरी लागली. या नशीबवान व्यक्तीचे नाव स्टीव्ह गुडविन आहे.

हेही वाचा : नातू असावा तर असा! आजीला पॅरिस फिरायला घेऊन आला; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल…

स्टीव सांगतो की त्याच्या लॉटरीचा नंबर ७३ होता. त्याला कधीही वाटले नव्हते की तो इतकी मोठी रक्कम जिंकू शकेल पण जेव्हा लॉटरी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याला सुखद धक्काच बसला.

स्टीव्ह पुढे सांगतो, “जेव्हा मी लॉटरीचे तिकीट जिंकून घरी गेलो तेव्हा मी कबाब खाण्यासाठी काढले पण मी एवढा आनंदी होतो की मी कबाब खाऊ शकलो नाही. याच कबाबने मला करोडपती बनवले, हा विचारच माझ्या मनातून जात नव्हता. रात्रभर मी लॉटरीचे तिकीट उशीखाली घेऊन झोपलो.”

हेही वाचा : हत्तीने सोंडेने काढले चक्क स्वत:चेच चित्र, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल फॅन; पहा थक्क करणारा Video

स्टीव्हने सुरुवातीला आपल्या आईला ही आनंदाची बातमी दिली. सुरुवातीला कुणालाच त्याच्यावर विश्वास बसला नाही. नंतर सर्वांना कळले की तो खरे बोलतोय. विशेष म्हणजे लॉटरी विजेता झाल्यानंतरही स्टीव्ह आताही ड्रायव्हरची नोकरी करतोय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bus driver buy chicken kebabs and won 10 crore rupees read what happened viral news ndj