सोशल मीडियावर घरगुती मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओमध्ये मायलेकांचा गोडवा, तर काही व्हिडीओमध्ये आजी नातवांचे प्रेम दिसून येते. कुटूंबातील अनेक मजेशीर आणि भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्हाला एक हौशी आजी नातीच्या वाढदिवशी आनंदाने उड्या मारताना दिसताना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हायरल व्हिडीओ एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आहे. संचिता नावाच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि ती केक कापण्यासाठी एका खूर्चीवर बसलेली दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नातीच्या या वाढदिवशी आजीचा आनंद गगनात मावेनासा होता. या हौशी आजीने थेट सर्वांसमोर आनंदाने उड्या मारत नातीला शुभेच्छा दिल्या. आजी टाळ्या वाजवत उड्या मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे आणि जोरजोराने ‘हॅपी बर्थ डे’ म्हणताना दिसत आहे. आजीचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून कुणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल

हेही वाचा : बापरे! चक्क माकडांना दारु पाजली अन्…, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

हा व्हिडीओ attitude_maxx_sai_02 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लोकांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले, “आजी खूप क्युट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यालाच खरं आयुष्य जगणे, म्हणतात. आणखी एका युजरने लिहिले, “देवा, असे आनंदी जीवन प्रत्येकाला दे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A granmother dance and jumped with joy and wished grandchild on her birthday watch grandmas enthusiasm video goes viral ndj