मेक अप उतरल्यानंतर आपल्या बायकोला पाहून एका नव-याने तिला चक्क घटस्फोट दिला आहे. हे जोडपे पोहण्यासाठी गेले होते तेव्हा पाण्यात त्याच्या पत्नीचा मेक अप उतरला. विना मेक -अप असलेली पत्नी आपल्याला ओळखूच आली नाही असे सांगत  या नव-याने तिला घटस्फोट दिला आहे.
सौदी अरेबियामधील नवविवाहित जोडपे पोहण्यासाठी अल मामझारच्या किना-यावर गेले होते. पण पाण्यात गेल्यावर या महिलेच्या चेह-यावरील मेकअप पाण्यात निघून गेला. विना मेक अप आपल्या पत्नीला पाहिल्यावर त्याला धक्का बसला. जिच्याशी आपण लग्न केले ती खूपच सुंदर दिसत होती पण मेकअप गेल्यानंतर  प्रत्यक्षात मात्र आपली पत्नी फारच कुरुप दिसते असता आरोप करून ३४ वर्षीय पतीने आपल्या २८ वर्षीय पत्नीला घटस्फोट दिला आहे. इतकेच नाही तर पत्नीने प्लॅस्टिक सर्जरी करुन आणि मेकअप चढवून आपल्याला फसवले असा आरोपही या नव-याने केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थीतीत आपण बायकोला स्वीकारणार नाही असेही या नव-याने निक्षून सांगितले. सध्या या पत्नीवर मानोपसचार तज्ज्ञांकडे इलाज सुरू आहे. आपण सुंदर दिसावे यासाठी चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी केल्या होत्या आणि याची माहिती पतीला लग्नाआधीच देणार होतो पण भितीमुळे आपण हे सत्य लपवल्याचे पत्नीने कबुल केले.