आज काल आपल्याला श्वानाचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कोणी त्यांच्या श्वानाला कपडे परिधान करतात, कोणी त्यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करताना दिसतात, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहतो. मात्र, आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक श्वान रिक्षाच्या छतावर असल्याचे दिसते असून तो रिक्षावाला ती रिक्षा चालवताना दिसतो. त्यानंतर एका मुलीने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत एक रिक्षावाला असून त्याच्या रिक्षाच्या छतावर तो श्वान असल्याचे दिसतं आहे. तर हे पाहताच एका मुलीने त्या रिक्षावाल्याला थांबवले आणि त्याला श्वानाला खाली उतरवायला सांगितले. तर तो तिलाच सांगतो की तू त्याला खाली उतरव. त्या रिक्षावाल्याने तो त्याचा पाळीव श्वान असून तो त्याच्यासोबत काही करेल आणि त्याला बांधण्यासाठी त्याच्याकडे बेल्ट असल्याचे सांगितले. एवढंच नाही तर त्याने तू एक स्त्री आहेस म्हणून नाही तर मी बोललो असतं असं म्हणाला आहे. ती मुलगी मी पोलिसांना बोलवेन म्हणाल्यावर तो रिक्षावाला म्हणाला मी महिला पोलिसांना बोलावलं तर तुला मारतील. त्यानंतर त्यामध्ये ट्राफिक पोलिस आले आणि त्यांनी ही सगळी गोष्ट सांभाळली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका
दरम्यान, या व्हिडीओवर कमेंट करत त्या मुलीने चांगली गोष्ट केल्याचे म्हटले आहे. तर एक नेटकरी म्हणाला, ‘जर तो श्वान खाली पडला असता आणि त्याचा पाय तुटला असता तर.’ प्राण्यांची काळजी घ्या अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्या मुलीने बरोबर केले असे म्हटले आहे. तर काहींनी ‘तो श्वान त्याचा आहे. त्याने त्याला सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत की रिक्षाच्या छतावर कसं उभं राहायचं, तर या मुलीला काय त्रास होतोय,’ असं म्हटलं आहे.