उत्तर प्रदेशमधल्या मिठौली गावात एक आगळा वेगळा विवाह पार पाडला. ३० वर्षे लग्न न करता एकत्र राहिलेल्या जोडप्याने अखेर वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरता सारा गाव या दोघांच्या विवाह सोहळ्याला आला होता. ७६ वर्षांचे नोखेलाल मौर्य यांनी ७० वर्षांच्या रामदेवी यांच्यांशी सोमवारी विवाहबद्ध झाले. गावच्या मंडळींनी धुमधड्याक्यात आणि पारंपरिक पद्धतीने या दोघांचं लग्न लावून दिलं.
वाचा : पदवीधर तरुणाची सामाजिक बांधिलकी!; गर्भवती महिलांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू
नोखेलाल यांनी १९८४ मध्ये रामदेवी यांना मिठौली गावात आणलं होतं. तेव्हापासून हे दोघंही एकत्र राहात आहेत. पण दोघांनी लग्न मात्र केलं नव्हतं. या दोघांना चार मुली देखील आहेत. तर दहा नातवंड देखील आहेत. आपल्या आजीला नववधुसारखं नटवून तिला लग्नमंडपात आणण्यात आलं त्यानंतर या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या काही वर्षांपासून या दोघांवरही लग्न करण्यासाठी घरचे दबाव टाकत होते पण लग्न न करण्याचा यांचा विचार पक्का होता, पण नंतर मात्र ३0 वर्षे एकत्र घालवल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
वाचा : १२ वर्षांच्या मुलाचं धाडस पाहा, चक्क बसच पळवली!