आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचे ट्विटर अकाऊंट मनोरंजक व्हिडिओ आणि विचारात्मक पोस्टची खाण आहे, असे म्हटले तर वावग ठरणार नाही. त्यांना ट्विटरवर अनेक लोक फॉलो करतात. दरम्यान, आज (सोमवार) महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी ट्विटरवर एक व्यक्ती डोक्यावर विटांचा ढीग संतुलित करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. एका तासाच्या आत व्हिडिओला ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ३ हजार लाईक्स मिळाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५७ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, एक माणूस त्याच्या डोक्यावर एक-एक करून विटांचा ढीग रचतांना दिसतो. हा व्हिडिओ भारतातील एका बांधकाम साइटवर घेण्यात आल्याचे दिसत आहे.

आनंद महिंद्रा यांनी डोक्यावर विटा उचलणाऱ्या व्यक्तीच्या कौशल्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “कोणीही अशा प्रकारचे धोकादायक शारीरिक श्रम करू नये. परंतु या माणसाने त्याच्या मेहनतीला कला स्वरूपात रुपांतर केल्याबद्दल तुम्हाला त्याचे कौतुक नक्कीच करावे लागेल. हा कुठून आलाय हे कोणाला माहितीय का? त्याचा मालक त्याच्या स्किल ओळखून त्याला ऑटोमेशनम देऊ शकतो का? असंही त्यांनी विचारलंय.

व्हिडिओ पाहिल्यानंतर, ट्विटर वापरकर्त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ऑटोमेशनम लक्ष वेधले की, ऑटोमेशनमुळे केवळ मजुरांच्या नोकऱ्या गमावल्या जातील. एका वापरकर्त्याने लिहिले, “सर, याचा दुर्दैवी भाग असा आहे की, जर हे ऑटोमेशनम झाले आणि हा माणूस दुसरे काम करण्यात कुशल नसेल, तर तो आणि त्याच्यासारखे बरेच लोक त्यांच्या उपजीविकेची संधी गमावतील.”

हेही वाचा- खासदार सनी देओलने दिलेलं ‘हे’ शिफारस पत्र पाहून अनेकजण संतापले; म्हणाले, “यासाठी निवडून दिलंय का?”

आणखी एका वापरकर्त्यानी म्हटले आहे की, “ऑटोमेशनमुळे, हे कामगार त्यांच्या नोकऱ्या गमावतील .. मी सहमत आहे की ते सुरक्षित असणे आवश्यक आहे, परंतु या कामगारांना इतर काही माहित नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra shares viral video on twitter man balancing stack of bricks on his head srk