शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्स या साखळी बेकरीचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. यावर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या भूमिकेला टोलवताना कराचीच एक दिवस भारताचा भाग असेल असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरुन आता काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे. “फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच!”, असं ट्विट जगताप यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> अमृता फडणवीसांच्या गाण्यावर Dislikes चा पाऊस

मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली नुकतीच केली होती. यावरच प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी, “आमचा ‘अखंड भारत’वर विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की कराची एक दिवस भारताचा भाग असेल,” असं म्हटलं होतं. मात्र आता फडवीसांच्या या कमेंटवरुन भाई जगताप यांनी सोशल नेटवर्कींगवरील एक वक्तव्य ट्विट करत फडणवीस दांपत्याला टोला लगावला आहे. “फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, कराचीकर घरदार सोडून पळून जातील. मग कराची आपलीच!”, असं भाई जगपात म्हणाले आहेत.


विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणं गायलं होतं. अमृता यांनी स्त्रियांना समर्पित केलेल्या या गाण्यामध्ये  दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून देणारं तिला जगू द्या हे गाणं पोस्ट केलं होतं. मात्र या गाण्यावरुन अमृता फडणवीस सोशल नेटवर्कींगवर ट्रोल झाल्याचे दिसून आलं. टी- सिरीज मराठी या युट्यूब अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला लाईक्स पेक्षा डिस्लाईक जास्त असल्यानेही त्या ट्रोल झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा भाई जगताप यांनी अमृता यांचं नाव न घेता त्यांच्या गाण्यावरुन माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhai jagtap slams devendra fadnavis over his karachi comment scsg