सोशल मीडियावर सध्या एका बुलडॉग जातीच्या कुत्र्याचा फोटो बराच व्हायरल होतोय. या फोटोमध्ये हा कुत्रा उदास, रुसलेला दिसतोय. बुलडॉगचा हा फोटो जॉर्जियाच्या रशिदा ऐलीस (Rashida Ellis) यांनी शेअर केला आहे.

रशिदा यांनी हा फोटो शेअर केल्यापासून नेटकऱ्यांच्या हा फोटो चांगलाच पसंतीस पडत आहे. या फोटोसोबत, “इमारतीतील लहान मुलांसोबत खेळता येत नसल्यामुळे बिग पोपा आज खूप दुःखी आहे. तो केवळ त्यांना बाल्कनीत बसून बघू शकतोय” असं ट्विट ऐलीस यांनी केलं आहे.

“करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने बिग पोपा बाहेर जाऊ शकत नाहीये…त्यामुळे त्याचं सर्वात आवडीचं काम अर्थात लहान मुलांसोबत त्याला खेळता येत नाहीये. म्हणून तो रुसलाय. कोणीतरी बाहेर घेऊन जावं यासाठी बाल्कनीमध्ये बसून बिग पोपा गोंधळ घालतोय….पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये.” असंही रशिदा ऐलीस यांनी म्हटलं आहे.

उदास बसलेल्या या तीन वर्षांच्या बुलडॉगचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. सामान्य नेटकऱ्यांपासून दिग्गज कलाकारही या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. बिग पोपाच्या या फोटोने गेम ऑफ थ्रोन्स स्टार मेसी विलियम्सचंही लक्ष वेधलंय. ट्विटरवर आतापर्यंत ९२ हजारांपेक्षा अधिक जणांनी हा फोटो रिट्विट केलाय. तर, जवळपास आठ लाखांहून जास्त युजर्सनी हा फोटो लाइक केला आहे.

रशिदा यांनी हा फोटो शेअर केल्यापासून नेटकऱ्यांच्या हा फोटो चांगलाच पसंतीस पडत आहे.