VIRAL VIDEO : बॉयफ्रेंड असावा तर असा…झाडाखाली बसून हे लव्ह बर्ड्स काय करत आहेत? पाहा

असं नक्की हे जोडपे करतात काय? हे जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता वाढली असेल.

VIRAL VIDEO : बॉयफ्रेंड असावा तर असा…झाडाखाली बसून हे लव्ह बर्ड्स काय करत आहेत? पाहा
(Photo: Isntagram/ ghantaa)

प्रेमात आणि युद्धात वाट्टेल ते चालतं.. हे असं कुणी तरी सांगितलं आणि युद्धाचं माहीत नाही, पण प्रेमात हरवून गेलेले जोडप्यांच्या बाबतीत हे लागू होतं. आपण गार्डनमध्ये किंवा एखाद्या पार्कमध्ये फिरायला गेलो की तिथे एकमेकांमध्ये बुडालेले, एकमेकांच्या गप्पांमध्ये रमलेले जोडपी दिसून येतातच. अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये जोपडी एका नदीच्या काठावर आरामात बसून डेट एन्जॉय करत आहे. पण त्यांची ही डेट काहीशी वेगळी आणि हटके आहे. असं नक्की हे जोडपे करतात काय? हे जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता वाढली असेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नदी काठी पाण्यात पायऱ्यांवर बसलेले दिसतील. या व्हिडीओमधला बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडच्या मागे बसलेला असतो. झाडाखील थंड सावलीत रोमॅंटिक क्षणांचा आस्वाद घेत घेत या व्हिडीओमधला बॉयफ्रेंड एक मजेदार गोष्ट करतो. अशी ‘रोमँटिक’ डेट क्वचितच कोणी केली असेल. बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडच्या केसांतून उवा काढताना दिसतोय. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला विचित्र वाटेल. पण अशा पद्धतीची ही देसी डेट तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल. अशी डेसी डेट स्टाईल नेटकऱ्यांना मात्र खूप आवडली आहे.

आणखी वाचा : ‘हेलिकॉप्टर भेळ’ कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा मजेदार रोमँटिक व्हिडीओ ‘घंटा’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होऊ लागलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३.४ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : २ वर्षाच्या या ऑटिस्टिक मुलाने लाखो लोकांना वेड लावले, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जेव्हा नेटकरी म्हणाले, ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ , मग Chris Hemsworth ने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

हा व्हिडीओ नेटिझन्सना इतका आवडला की त्यावर युजर्सच्या कमेंट्सचा महापूर सुरू झाला आहे. या व्हिडीओमध्ये काळजीवाहू प्रियकर दिसतोय, असं अनेक महिलांनी कमेंट केली आहे. एका महिला युजरने लिहिले की, “आय विश सो केअरिंग बीएफ” दुसर्‍या युजरने कमेंट करताना लिहिलं की, “मी तुम्हाला परवानाकृत औषध खरेदी करून देईल” तर दुसर्‍या युजरने गंमतीने लिहिले की, “हा बॉयफ्रेंड आहे की माकड?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
२ वर्षाच्या या ऑटिस्टिक मुलाने लाखो लोकांना वेड लावले, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एकदा पाहाच!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी