Crocodile Attack On A Boat : मगरीसारख्या खतरनाक शिकारीच्या तावडीतून वाचणं अशक्यच असतं. कोणत्याही प्राण्यावर किंवा माणसावर मगर हल्ला करते आणि त्यांची शिकार करते. शक्तिशाली जबडे आणि धारदार दातांनी मगर शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे तुकडे करते. त्यामुळे मगर किती भयानक असते, याचा अंदाज लावणे कठीण आहे. अशाच प्रकारचा अंगावर काटा आणणारा मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नदीच्या पाण्यातून एक बोट प्रवास करत असताना अचानक मगरींचा कळप त्या बोटीला विळखा घालतो आणि काही सेकंदातच जे घडतं, ते पाहून अनेकांचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, एक बोट नदीच्या पाण्यातून जात असते. त्याचदरम्यान मगरींचा कळप त्या बोटीजवळ येतो आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बोट पाण्याच्या प्रवाहातून सुसाट जात असल्याने मगरींना हल्ला करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे बोट थेट नदी किनाऱ्यावर जाते आणि खरतनाक मगरींच्या तावडीतून बोटीची सुटका होते. मगरींचा हा व्हिडीओ @cctvidiots नावाच्या
ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ‘एक भयानक बोट नदीतून प्रवास करताना..’

नक्की वाचा – सावधान! मोबाईल कव्हरच्या पाठीमागे ५०, १००, किंवा ५०० रुपयांची नोट ठेवता का? जाणून घ्या याचे परिणाम

इथे पाहा मगरीचा खतरनाक व्हिडीओ

आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियापासून अमेरिका ते आशियापर्यंत जगभरातील उष्णकटिबंध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मगरी आढळतात. मगरी पाण्यात राहून चपळाईने प्राण्यांवर हल्ला करतात. तसंच मगर वेगवान असल्याने तिच्या जवळपास असणाऱ्या प्राण्यांच्या नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. मगरींच्या हल्ल्यात अनेक प्राण्यांचा किंवा माणसांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जंगल परिसरात किंवा नदी किनारी मगरींपासून चार हात लांब राहण्याच्या सूचना वन विभागाकडून नेहमीच दिल्या जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crocodiles attack on a boat when passing through a river wild animal terrible video viral on twitter nss