तहानेनं व्याकूळ झालेलं हरण नदीकाठी पोहोचलं, मगरीने जबडा उघडला अन् काही सेकंदातच…; श्वास रोखून धरणारा Viral Video पाहाच | Loksatta

तहानेनं व्याकूळ झालेलं हरण नदीकाठी पोहोचलं, मगरीने जबडा उघडला अन् काही सेकंदातच…; श्वास रोखून धरणारा Viral Video पाहाच

नदीकाठी मगरीने हरणावर केलेला जीवघेणा हल्ला कॅमेरात कैद झाला आहे.

crocodile attacked viral video
पाणी पिण्यासाठी गेलेल्या हरणावर मगरीने हल्ला चढवला. (image-social media)

सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाघ आणि सिंहाच्या शिकारीचा थरारही तुम्ही व्हिडीओच्या माध्यमातून पाहिला असेल. जेव्हा वाघ, सिंहासारखा हिंसक प्राणी एखाद्यावर हल्ला करतो, तेव्हा क्वचितच एखाद्या प्राण्याची त्यांच्या तावडीतून सुटका होते. पाण्यात शिकारीसाठी वणवण फिरणारी मगरही शिकार करण्यात माहिर असते. मगरीच्या हल्ल्यातूनही स्वत:ला जीव वाचवणं अत्यंत कठीण असतं. पण एका हरणाने नदीकाठी पाणी प्यायल्या गेल्यानंतर कमालच केलीय. पाणी पिताना मगरीने जबडा वासल्यानंतर हरणाने जे काही केलं, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हरणावर मगरीने हल्ला केला, तितक्यात…

सोशल मीडियावर मगरीने हरणावर हल्ला केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तहानेनं व्याकूळ झालेला हरण पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर मगर इतका भयानक हल्ला करेल, याचा हरणाला अंदाजही आला नसेल. कारण हरण जेव्हा नदीकाठी पाणी प्यायला गेलं, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता नदीत असलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला चढवला. पण चपळ हरणाने काही सेकंदातच उडी घेत हरणाच्या तावडीतून सुटका केली. हरणाची चपळता मरणाच्या उंबरठ्यावरून तिला बारेह घेऊन आली. हे सर्व दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – Rohit Sharma twitters favorite: दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या वादळी खेळीनं चाहत्यांची मनं जिंकली, नेटिझन्सच्या भन्नाट मिम्स ट्विटरवर व्हायरल

पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणावर मगरीने जीवघेणा हल्ला चढवला. पण हरणानेही तल्लख बुद्धीचा वापर करुन मगरीच्या हल्ल्यातून सहज सुटका केली. हा सर्व थरार कॅमेरात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षावही होत आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. wildlifeanimall या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 13:48 IST
Next Story
Video: नकली पोशाख घालून ‘तो’ चक्क मगरीजवळ जाऊन झोपला; तिचा पाय ओढला अन् तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण