भारत देशाला संतांची भूमी म्हटलं जातं. देशात अनेक राज्यात देवदेवतांची प्राथनास्थळे आहेत. मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्यासाठी शेकडो भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. काही भक्त देवावर असलेला भक्तीभाव अर्पण करण्यासाठी साष्टांग दंडवत घालतात. पण गुजरातच्या एका मंदिरात काहिसं वेगळं घडलं आहे. देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेला भक्त चक्क हत्तीच्या मूर्तीखाली अडकला अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून एक भक्त हत्तीच्या मूर्तीखाली अडकला असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलेला भक्त हत्तीच्या मूर्तीखाली अडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मूर्तीखाली अडकल्यानंतर तो भक्त स्वत:ला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तसंच मंदिरात असणारे पंडीतही त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. भक्ताला बाहेर काढण्यासाठी अनेक जण सल्लामसलत करतानाही व्हिडीओ मध्ये दिसतात.

नक्की वाचा – बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूनं गाठलं, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा

इथे पाहा व्हिडीओ

चुरूमूरी नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी गोंधळात पडले आहेत. हत्तीच्या मूर्तीखाली भक्त कसा अडकला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मंदिरात असलेले इतर भक्त आणि पंडीत या व्यक्तीला सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसत नाहीय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हत्तीच्या मूर्तीखाली अडकलेल्या भक्ताची सुटका झाली की नाही, या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यातच असल्यासारखं दिसत आहे.