सोशल मीडिया आणि मीम्स यांचं एक अतूट नातं आहे. कोणतीही मोठी किंवा छोटी घडामोड असो, अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर त्यावरून भन्नाट मीम्स पोस्ट आणि व्हायरल होत असतात. दिवाळीचं निमित्त असताना कंपनीचा बोनस आणि ऑफिसवरून अनेक हास्यास्पद मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल..

दिवाळीच्या सणावरही करोनाचं सावट आहे. अशा वेळी कंपनीत यंदा दिवाळीचा बोनस मिळणार की नाही, सरकारी आणि खासगी कंपनीत कशा प्रकारचे बोनस मिळतात यांसारख्या विषयांवर हे भन्नाट मीम्स तयार करण्यात आले आहेत. हे मीम्स तयार करणारे अनेक पेजेस सोशल मीडियावर सक्रिय असून विषय आणि घडामोडींनुसार अल्पावधीत ते मीम्स तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. सामान्यांच्या आयुष्याशी निगडीत हे मीम्स असल्याने अनेकजण ते मित्रमैत्रिणींना टॅग करून सोशल मीडियावर शेअरसुद्धा करतात. त्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना हे मजेशीर मीम्स चेहऱ्यावर हास्य नक्की आणतात.