Man cobra dance viral video: सोशल मीडियावर एका दारुड्याच्या नागिन डान्सचा भन्नाट व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. गारुड्यानं पुंगी वाजवल्यावर एका दुकानात असलेला दारुड्या नागासारखा फणा काढून बाहेर येतो. गारुड्याही पुंगीवर त्याला थिरकवण्यचा प्रयत्न करतो. पण हा पठ्ठ्या नशेत टुल्ल होऊन गारुड्याच्या अंगावर येतो आणि नागासारखा फणा मारण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व मजेशीर प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरलं नाहीय. व्हिडीओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. हा कुणाचा मित्र आहे? असं मजेशीर कॅप्शन देऊन हा व्हिडाओ शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओत एक गारुडी पुंगी वाचवताना दिसत आहे. पुंगीच्या तालावर दुकानात असलेला एक व्यक्ती नागासारखा फणा काढून भन्नाट डान्स करताना दिसत आहे. गारुड्यापुढं दारुड्याचे ठुमके पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून व्हिडीओ शेअरही केला जात आहे. याआधीही अशाच प्रकारचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दारुड्याचा भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांचं मनोरंजन तर झालंच आहेच, याशिवाय नेटकरीही या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.

नक्की वाचा – Video: शिकाऱ्याचीच झाली शिकार! भर रस्त्यात रानडुक्करांनी चक्क बिबट्याला तुडव तुडव तुडवलं, थरारक दृष्य कॅमेरात कैद

इथे पाहा व्हिडीओ

दिवसेंदिवस सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. भर लग्नमंडपातही नववधू थिरकतानाचे व्हिडीओ, तसचे नवरा-नवरी स्टेजवर ठुमेक लगावताना, डीजेच्या तालावर तरुण मुलं भन्नाट डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रस्त्यावर, मंडपात, कारमध्ये, शाळेतील वर्गातही डान्स करण्याची क्रेझ वाढत असल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून आपण पाहिलं असेल. इंटरनेटवर प्रकाशझोतात येण्यासाठी कोण काय करील याचा नेम राहिला नाही. कारण गारुड्याच्या पुंगीवर फणा काढून भन्नाट डान्स करून लोकांना पोट धरून हसवणाऱ्या या पठ्ठ्यानंही कमालच केली आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk man nagin dance while charmer playing a bean funny viral video on instagram netizens comedy reactions nss