‘देव तारी त्याला कोण मारी’… या मराठीतील प्रचलित म्हणीचा प्रत्यय यावा अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तामिळनाडूच्या तिरुचेनगोडे येथील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झालेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला हातात सामानाची पिशवी घेऊन रस्ता पार करण्यासाठी एका वळणावर उभी असल्याचं दिसतंय. तितक्यात मागून एक ट्रक येतो आणि तो थेट त्या महिलेच्या अंगावरुन जातो. ट्रक गेल्यानंतरचं दृष्य पाहून नेटकरी बुचकळ्यात पडलेत. कारण, ट्रक गेल्यानंतर ही वृद्ध महिला अत्यंत सुखरुप होती, तिला कुठे साधं खरचटलंही नव्हतं.


उजवीकडे वळण घेताना ट्रक ड्रायव्हरला महिला न दिसल्याने हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीये. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून ट्रक अंगावरुन जाऊनही ती महिला बचावली कशी, याबाबत अनेक नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. उजवीकडे वळण घेताना ट्रक ड्रायव्हरला महिला न दिसल्याने हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.